TCS Nashik Case : निदा खानला दिलासा नाही; जामीन अर्जावर १२ जूनला सुनावणी

नाशिक : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिक युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १२ जून रोजी होणार आहे. नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी सुनावणी पुढे ढकलत पुढील तारीख निश्चित केली.


याच प्रकरणातील अन्य आरोपी दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जांवरही १२ जूनलाच सुनावणी होणार आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. ११ मे रोजी तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यानंतर तिच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती.


दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) नाशिक न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या आठ वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित हे आरोपपत्र भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दाखल करण्यात आले आहे.



या आरोपपत्रात रझा रफीक मेमन, शाहरुख हुसेन कुरेशी, अश्विनी अशोक चैनानी, तौसिफ अत्तार, शफी भिकन शेख, दानिश शेख आणि निदा खान यांच्यासह इतर आरोपींची नावे समाविष्ट आहेत.


याआधी २२ मे रोजी SIT ने देवलाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल १,५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबरोबरच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


TCS नाशिक युनिटमधील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी शोषण, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग, मानसिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने SIT स्थापन केली होती.



तक्रारदार महिलांच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचाऱ्यांवर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच प्रार्थना करणे, मांसाहार स्वीकारणे आणि धार्मिक रूढींनुसार वागण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.


निदा खानवर महिला कर्मचाऱ्यांना इस्लामिक परंपरेनुसार पोशाख आणि वर्तन करण्याचा सल्ला देत दबाव निर्माण केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून तपास सुरू आहे.


दरम्यान, TCS ने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारच्या छळ, दबाव किंवा सक्तीविरोधात कंपनीची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आरोपांमध्ये नाव आलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

Comments
Add Comment

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात प्रचंड उलटफेर! आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की ऊन पडणार? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू