Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! पत्नीला 4 तास 'मुर्गा' करून केला अमानुष छळ; माहेरी जाऊन चाकू हल्ला, आरोपी अटकेत

Crime News : मुंबईतील चेंबूर परिसरातून घरगुती हिंसाचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या पत्नीचा तब्बल चार तास अमानुष छळ करत तिला मुर्गा करून ठेवले होते. पट्ट्याने मारहाण केली आणि तलवारीने ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. एवढ्यावरच न थांबता पत्नी माहेरी गेल्यानंतर आरोपीने तेथेही धडक देत पत्नी, सासरे आणि मेव्हण्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


नेमकं घडलं काय ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वाशीनाका परिसरातील रहिवासी आहे. तिचा पती अरबाज अन्वर अली सय्यद हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी 18 गुन्ह्यांची नोंद आहे. डिसेंबर 2025 मध्ये त्याला तडीपारही करण्यात आले होते. बकरी ईदच्या दिवशी आरोपीने पत्नीला कपडे आणि अत्तर खरेदी करण्याच्या बहाण्याने विजय नगर परिसरात आणले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर त्याने पत्नीशी वाद घालत शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. आरोपीने पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण करत तिला सुमारे चार तास मुर्गा बनवून छळ केला. तसेच तलवारीने कापून टाकण्याची आणि ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे.


माहेरी जाऊन पत्नीला संपवलं....


रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास महिला आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेऊन माहेरी पोहोचली. मात्र पत्नी माहेरी गेल्याच्या रागाच्या भरात तो पण तिथे आला आणि त्याने पीडितेचे वडील आणि भाऊ यांच्याशी वाद घालत मारहाण सुरू केली. गोंधळ ऐकून बाहेर आलेल्या महिलेच्या बहिणीलाही आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. वाद वाढल्यानंतर आरोपीने चाकू काढून पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. स्वतःचा बचाव करताना महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने हवेत चाकू फिरवत परिसरातील नागरिकांनाही धमकावले. मध्ये पडलात तर ठार मारेन, अशी धमकी देत त्याने घाबरवले.जखमी महिलेला तिच्या भावाने तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न, मारहाण, धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करत आरोपी अरबाज सय्यद याला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक