Viral : तब्बल ९ वर्षे IT क्षेत्रात मॅनेजर, आता चालवते रिक्षा, भक्कम पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत घेतला धाडसी निर्णय...

Viral Video : मोठ्या आयटी कंपन्यांमधील आकर्षक पगार, शानदार जीवनशैली आणि करिअरची चमक अनेकांना आकर्षित करते. मात्र या मागील ताणतणाव अनेकदा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करताना दिसत आहेत. अशाच एका महिलेने कॉर्पोरेट जगतातील तणावाला कंटाळून आयुष्याला वेगळे वळण दिले आहे. तिची कहाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.


९ वर्ष IT क्षेत्रात करियर


व्हायरल व्हिडिओनुसार, संबंधित महिला तब्बल नऊ वर्षे आयटी क्षेत्रात मॅनेजर पदावर कार्यरत होती. मोठा पगार, प्रतिष्ठित पद आणि सुरक्षित करिअर असूनही सततच्या डेडलाईन्स, कामाचा ताण आणि मानसिक दबावामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य विस्कळीत झाले होते. अखेर या महिलेने आयटी क्षेत्र सोडून रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेट जीवनातील ताण त्रासदायक झाल्यानंतर तिने नोकरीचा राजीनामा देत पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. आज ती रिक्षा चालवते आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायातून ती महिन्याला सुमारे ६० हजार रुपये कमावत असल्याचा दावा केला जात आहे.


व्हायरल व्हिडीओतून केलेला दावा


व्हिडिओमध्ये बोलताना ती म्हणते, आता माझ्यावर कोणत्याही बॉसचा दबाव नाही आहे. आता मी माझ्या वेळेनुसार काम करते आणि आयुष्याचा आनंद घेते. पूर्वी पैशांसोबत ताणवही होता, आता मनाला शांतता मिळते आहे. तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मानसिक ताण कमी झाला असून सध्याचे आयुष्य अधिक समाधानकारक वाटत असल्याचे ती म्हणाली. सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींनी तिच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले, तर काहींनी इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी तिने आर्थिक नियोजन केले असावे, असे मत व्यक्त केले. या निमित्ताने कॉर्पोरेट क्षेत्रातील तणावाचा विषय चर्चेत आहे आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व वाढलं आहे.ताज्या घटनेमुळे आजच्या तरुण पिढीची बदलती मानसिकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केवळ मोठा पगार किंवा प्रतिष्ठित नोकरी यापेक्षा मानसिक समाधान, काम आणि जीवन यातील समतोल तसेच आनंदी आयुष्य यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे या घटनेतून दिसून येते आहे. जगातील ताणतणाव आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, या महिलेचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी आणि विचार करण्यासारखा आहे.

Comments
Add Comment

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Amit Shah : शेतकरी, तरुण अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा! सिलीगुडीत तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाला गृहमंत्री अमित शाहंची भेट

सिलीगुडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siligudi) येथे 'तीन नवीन फौजदारी

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड

Kangana Ranaut vs Sharmila Tagore : 'वंदे मातरम' वादावर खासदार कंगना रणौतची शर्मिला टागोर यांच्यावर टीका : "कलेला धर्मात अडकवू नका"

राष्ट्रगीत 'वंदे मातरम'बद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री आणि

Mahadev Betting Scam : महादेव बेटिंग प्रकरणातील सौरभ चंद्राकर मोठे खुलासे करण्यास तयार? भारताकडे मागितले साक्षीदार संरक्षण

Mahadev Betting Scam : महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क प्रकरणातील कथित सूत्रधार सौरभ चंद्राकर याने या प्रकरणाशी संबंधित