आयएसआय-दाऊद नेटवर्कशी संबंधित दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, दाऊद इब्राहिम गँग आणि शहजाद भट्टी नेटवर्कशी संबंधित आठ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून पाकिस्तानमध्ये तयार केलेली शस्त्रे, ग्रेनेड आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हे मॉड्यूल दिल्ली, मुंबई, पंजाब आणि चंदीगडमधील प्रमुख धार्मिक स्थळे, सरकारी इमारती, मंत्रालये आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते. पोलिसांचे म्हणणे आहे की हे नेटवर्क दीर्घकाळापासून सक्रिय होते आणि योजनाबद्ध पद्धतीने हल्ल्यांची तयारी करत होते.अटकेतील आरोपींमध्ये उत्तर प्रदेशातील विजय उर्फ शूटर, झारखंडचा नितीश पासवान, महाराष्ट्रातील तौकीर रिझवान अहमद शेख आणि साजिद महबूब शेख उर्फ अरबाज खान, पंजाबचे हरविंदर सिंग, गगनदीप सिंग आणि मनजीत सिंग तसेच नेपाळचा नागरिक आंग कामी लामा यांचा समावेश आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, विजय उर्फ शूटर याला दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच दिल्ली-एनसीआरमध्ये युवकांची भरती करून त्यांना या नेटवर्कशी जोडण्याचे कामही त्याच्याकडे होते.


स्पेशल सेलने विजयला १४ मे रोजी पुण्यातून आणि त्याचा सहकारी नितीश पासवानला 17 मे रोजी झारखंडच्या साहिबगंजमधून अटक केली. तपासात समोर आले की दोघांची भरती मुंबईतील हुजैफा नावाच्या व्यक्तीने केली होती, जो सध्या फरार आहे.विजयच्या चौकशीनंतर पोलिसांनी २७ मे रोजी मुंबईतून तौकीर रिझवान अहमद शेख आणि साजिद महबूब शेख उर्फ अरबाज खान यांना अटक केली. तपासात असेही उघड झाले की हे दोघे आयएसआयशी संबंधित हँडलर यावर खान आणि मुन्ना झिंगाडा यांच्या संपर्कात होते.मुंबईतील आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांना पंजाबमधून एक टीम दिल्लीला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्पेशल सेलने महरौली–बदरपूर रोडवर कारवाई करत हरविंदर सिंग, गगनदीप सिंग आणि मनजीत सिंग यांना अटक केली.



तपासादरम्यान नेपाळचा नागरिक आंग कामी लामा यालाही अटक करण्यात आली. तो दिल्लीत आरोपींसाठी निवासव्यवस्था आणि आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचे समोर आले आहे.स्पेशल सेलच्या तपासात असेही स्पष्ट झाले की संपूर्ण मॉड्यूल पाकिस्तानस्थित अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह मुन्ना झिंगाडा, शहजाद भट्टी आणि इतर ISIशी संबंधित घटकांच्या संपर्कात कार्यरत होते.पोलिसांचे म्हणणे आहे की मुन्ना झिंगाडा हा दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता आणि सन २००० मध्ये बँकॉकमध्ये छोटा राजनवरील हल्ल्यात त्याचा सहभाग होता. नंतर तो सुमारे १७ वर्षे थायलंडच्या तुरुंगात होता.आंग कामी लामा २००१ ते २०१८ या काळात थायलंडमध्ये अंमली पदार्थ प्रकरणात तुरुंगात होता. याच काळात त्याची भेट मुन्ना झिंगाडा आणि इतर पाकिस्तानी नागरिकांशी झाली होती. सुटका झाल्यानंतरही तो त्यांच्या संपर्कात राहिला. अधिकाऱ्यांनी ही कारवाई मोठे यश असल्याचे सांगत संभाव्य दहशतवादी कट वेळेत उधळल्याचे स्पष्ट केले आहे. अटक केल्यानंतर संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, तपास यंत्रणा या नेटवर्कचा विस्तार आणि सीमापार संबंधांचा सखोल तपास करत आहेत.-

Comments
Add Comment

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत