Pune News : मांजरीवरून शेजाऱ्यांमध्ये वाद; ६० वर्षीय महिलेच्या डोक्यात वीट मारल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवड : किरकोळ कारणांवरून होणारे वाद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील ताथवडे परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात मांजरी ये-जा करत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६० वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत संबंधित महिला जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यात वीट फेकून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.


ही घटना ताथवडे परिसरात घडली असून कविता चिंतामणी सोनवणे (वय ६०) या येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी सूर्यवंशी कुटुंब राहते. या कुटुंबाकडे काही मांजरी असून त्या वारंवार सोनवणे यांच्या घरात येत असल्याची तक्रार त्यांनी अनेकदा केली होती. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे.



याच कारणावरून कविता सोनवणे आणि सूर्यवंशी कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद झाला. हा वाद हळूहळू वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. तक्रारीनुसार, सारंग सूर्यवंशी आणि दोन महिलांनी कविता सोनवणे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या केसांना धरून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच सारंग सूर्यवंशी याने त्यांच्या कपाळावर वीट फेकून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.



या हल्ल्यात कविता सोनवणे गंभीर जखमी झाल्या. मारहाणीनंतर त्यांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलि‍सांनी (Police) संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


दरम्यान, केवळ मांजरी घरात येत असल्याच्या कारणावरून झालेल्या या वादाने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या या मारहाणीच्या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

Joe Root Test Stats : १३ धावा अन् महाविक्रम! जो रूट करणार सचिन तेंडुलकरची बरोबरी ?

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर

Jalgaon : बुरहानपूर येथे २५.१७ कोटींचा रेल्वे उड्डाणपूल; भुसावळ-खंडवा मार्गिकेच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत (Bhusawal Division of Central Railway) बुरहानपूर येथील लालबाग-खुनी भंडारा परिसरात रेल्वे व

Eijaz Khan on Govinda controversy : गोविंदा-सुनीता वादात एजाज खानची एण्ट्री; म्हणाला, “मुलांना भविष्यात काम मिळणं कठीण होऊ शकतं”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा (Govinda - Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक नात्यातील मतभेद पुन्हा

One Day One University Scheme : Gen Z सोबत थेट संवाद साधणार केंद्र सरकार; केंद्रीय मंत्र्यांची विद्यापीठांमध्ये भेट, ‘एक दिवस, एक विद्यापीठ’ योजनेची चर्चा

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढी, विशेषतः Gen Z सोबत थेट संवाद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवा उपक्रम राबवण्याची

Nashik : अपात्र शिधापत्रिका लाभार्थ्यांना दणका ! ४० हजार अपात्र लाभार्थी वगळले

Nashik : राज्यातील गरजू नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे यासाठी गरजू नागरिकांना सरकारकडून शिधापत्रिका (Ration card)

Indian Navy MQ-9B Sea Guardian : चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताची मोठी तयारी; अमेरिकेकडून ३० महिन्यांसाठी दोन अत्याधुनिक MQ-9B Sea Guardian ड्रोन लीजवर

नवी दिल्ली : हिंद महासागर क्षेत्रातील समुद्री निगराणी क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे.