Crime News : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरकामासाठी नोकरीवर ठेवलेल्या जोडप्याने मालकिणीचा विश्वासघात केला. कपाटातील तब्बल 3 लाख 58 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिने चोरले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.घरकामासाठी नोकरीवर ठेवलेल्या जोडप्याने घरातील सदस्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. पैसे, दागिने घरात कुठे असतात, तिथपर्यंत पोहचायचे कसे हे व्यवस्थित लक्ष ठेवून समजून घेतले. यानंतर एक दिवस संधी साधली. मालकिणीची नजर चुकवत आरोपींनी चावी हस्तगत केली आणि कपाटातील मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीमध्ये सोन्याची साखळी, ब्रेसलेट, अंगठ्या, हिऱ्यांनी जडवलेले दागिने तसेच कानातील टॉप्स अशा अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 3.58 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात मोठी मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात तब्बल ३३ ...
नेहमीच्या सवयीने मालकीणीने कपाट उघडून पाहिले असता दागिने गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर तिने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात घरकाम करणाऱ्या नोकरांविषयी संशय व्यक्त करण्यात आला. ज्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले त्यावेळी घरकाम करणारे जोडपे खासगी कामासाठी बाहेर होते. जे परतले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी जोडप्यालाच संशयित आरोपी म्हणून शोधायला सुरुवात केली आहे. म्हसरूळ पोलिस आरोपींचा शोध घेत असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.





