Nashik Crime News : शेअर मार्केटमध्ये ६% परताव्याचे आमिष; वकील, अधिकारी, सरकारी कर्मचाऱ्यांसह ४० जणांची कोट्यवधींची फसवणूक, दोन भाऊ अटकेत

नाशिक : शेअर मार्केटमधून दरमहा ४ ते ६ टक्के हमखास परतावा मिळवून देण्याचे आमिष आणि प्लास्टिक उत्पादन कंपनीत भागीदारी देण्याचे आश्वासन देत नाशिकमधील वकील, सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि इतर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या जानवलकर कुटुंबातील दोन सख्ख्या भावांना नाशिक गुन्हे शाखेने रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे. (Nashik Crime News)



बनावट गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून जाळे :


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सुरेश जानवलकर, युवराज सुरेश जानवलकर, सुरेश बाबुराव जानवलकर आणि संगीता सुरेश जानवलकर यांनी मिळून ‘फ्युचर स्टॉक मार्केट अनॅलिसिस’ या नावाने गुंतवणूक सल्लागार कंपनी सुरू केली होती. एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत त्यांनी अनेक गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात पैसे उभे केले. (Nashik Crime News)



याशिवाय, सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसी आणि अंबड परिसरातील प्लास्टिक बाटल्या तयार करणाऱ्या उद्योगात भागीदारी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. या आमिषाला बळी पडून अनेक सुशिक्षित नागरिक, वकील, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. एका फिर्यादीचीच तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. (Nashik Crime News)



पैसे मागितल्यावर घरही अनेकांना विकल्याचा आरोप :


गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांची मागणी सुरू केल्यानंतर जानवलकर कुटुंबाने आणखी एक धक्कादायक प्रकार केल्याचा आरोप आहे. नाशिकमधील स्वतःचे राहते घर एकाच वेळी दोन ते तीन वेगवेगळ्या व्यक्तींना साठेखत आणि खरेदीखत करून विकण्यात आले. या व्यवहारातून मिळालेली रक्कम घेऊन संपूर्ण कुटुंब नाशिकमधून फरार झाले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. (Nashik Crime News)



रायगडमध्ये लपलेल्या आरोपींना अटक :


पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखा युनिट-२चे पथक आरोपींचा माग काढत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रायगड जिल्ह्यातील खालापूर, नेरळ आणि खोपोली परिसरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून युवराज सुरेश जानवलकर (वय ३२) आणि यश सुरेश जानवलकर (वय ३०) या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Nashik Crime News)



पोलिस कोठडी सुनावली :


अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या फसवणुकीत आणखी किती लोकांची रक्कम अडकली आहे, तसेच इतर आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे नाशिकमधील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून, आकर्षक परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Nashik Crime News)

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान