CNG Price Hike : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! मुंबईत सीएनजीचे नवे दर जाहीर

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर मिडल-ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम आता थेट मुंबईकरांच्या खिशावर होऊ लागला आहे. मुंबई तसेच मुंबई महानगर परिसरातील वाहनधारकांना महागाईचा आणखी एक झटका बसला असून, सीएनजी (CNG Price Hike in Mumbai) दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील सीएनजी वितरण कंपनीने नव्या दरांची घोषणा केली असून, ही दरवाढ २९ मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.


गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि इंधनाच्या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच घरगुती एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder), पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांबाबतही चिंता व्यक्त केली जात असताना आता सीएनजीच्या (CNG) किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट (Budget) अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः रोजच्या प्रवासासाठी सीएनजी वाहनांवर (CNG Vehicles) अवलंबून असलेल्या लाखो मुंबईकरांवर या दरवाढीचा थेट परिणाम होणार आहे.



सीएनजीचे नवे दर किती?


सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचा किरकोळ दर ८४ रुपये प्रतिकिलोवरून ८६ रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. नव्या दरांमुळे खासगी वाहनधारकांसह व्यावसायिक वाहन चालकांच्या इंधन खर्चात वाढ होणार आहे.


रिक्षा-टॅक्सी (Auto-Taxi) भाडेवाढीची शक्यता


सीएनजी दरवाढीचा परिणाम मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील बहुतांश काळी-पिवळी टॅक्सी, ऑटो रिक्षा, बेस्टच्या काही बसेस तसेच मालवाहू व्यावसायिक वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे सीएनजीचा दर ८६ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने वाहनचालकांच्या खर्चात वाढ होणार आहे.



याच पार्श्वभूमीवर रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून भाडेवाढीची मागणी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या दरवाढीचा परिणाम प्रवाशांच्या खिशावरही पडू शकतो. त्यामुळे सीएनजी दरवाढीनंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या भाडेदरांमध्ये बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान