FIFA World Cup 2026 : भारतातील प्रसारण हक्क ZEE कडे जाणार? 35 दशलक्ष डॉलर्सच्या कराराची चर्चा; भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी...

मुंबई : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 भारतातील ब्रॉडकास्टिंग राइट्ससाठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज झी (ZEE) आणि जिओ हॉटस्टार JioHotstar) यांच्यात सध्या जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. अशातच आता झी आणि फिफा FIFA) यांच्यात एक मोठा करार झाल्याची बातमी समोर आली आहे. या करारामुळे झीने स्पर्धेत आघाडी घेतली आहे. जिओ हॉटस्टारच्या हातातील एक मोठी संधी हुकल्याचे बोलले जात आहे.


FIFA World Cup 2026 च्या भारतातील प्रसारण हक्कांसाठी FIFA आणि Zee यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुढील 24 ते 48 तासांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा ३० ते ३५ दशलक्ष डॉलरचा अर्थात २५० ते ३०० कोटी रुपयांचा करार आहे. यापूर्वी FIFA ने भारतातील प्रसारण हक्कांसाठी रिलायन्स-डिस्नेसोबत चर्चा केली होती. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये करार होऊ शकला नाही. तसेच सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियानेही हक्क मिळवण्याचे प्रयत्ने केले होते. मात्र त्यांच्यात काहीही पुढ होऊ शकले नाही. करारानुसार, FIFA World Cup 2026 मधील सर्व सामने Zee च्या नव्याने सुरू झालेल्या स्पोर्ट्स नेटवर्कवर ब्रॉडकास्ट केले जातील. तर डिजिटल प्रेक्षकांसाठी हे सामने Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात येणार आहे. हिंदी, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन आणि विशेष कार्यक्रम दाखवण्याची तयारीही सुरु असल्याचे सांगितले जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, झीने आधीच मुंबईतील लोअर परळ स्टुडिओमधून वर्ल्ड कप कव्हरेजसाठी विशेष टीम तयार केली आहे. हा करार अंतिम झाल्यास, झीचा क्रीडा प्रसारण क्षेत्रातील पुनरागमनासाठी हा मोठा टप्पा असेल. अलीकडेच कंपनीने Unite8 Sports 1 आणि Unite8 Sports 2 हे नवीन स्पोर्ट्स चॅनेल्स लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे, 2026 FIFA World Cup अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदांतर्गत खेळला जाणार आहे. 11 जून पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत प्रथमच ४८ संघ सहभागी होणार आहे. या हंगामात एकूण १०४ सामने खेळवले जातील. झी आणि फिफामधील करारामुळे आता भारतातील प्रेक्षकांना सर्व सामने पाहता येणार आहेत.





दरम्यान, उत्तर अमेरिकेतील वेळेनुसार सामने होणार असल्यामुळे भारतीय वेळेनुसार अनेक सामने उशिरा रात्री किंवा पहाटे खेळवले जातील. त्यामुळे टीव्ही प्रेक्षकसंख्येचा विचार करून FIFA ने भारतातील प्रसारण हक्कांची किंमत काही प्रमाणात कमी केली आहे.अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी FIFA World Cup 2026 आता Zee नेटवर्कवर पाहण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Indian Hockey Team : हॉकी विश्वचषकापूर्वी भारतीय स्ट्रायकरांनी सांगितला यशाचा फॉर्म्युला

नवी दिल्ली : एफआयएच हॉकी विश्वचषक-2026 च्या सुरुवातीला आता दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह फिटनेस टेस्ट पास ; श्रीलंका मालिकेसाठी सज्ज

मुंबई : भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पास केली आहे. भारतीय संघ आणि

IND vs BRA : भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक क्षण! पाच वेळच्या विश्वविजेत्यांचा सामना भारतात होणार; भारतीय चाहत्यांसाठी आंनदाची बाब

मुंबई : भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये राऊंड ऑफ १६ खेळणारा फुटबॉल संघ

Cricketer Commits Suicide : नागपुरात १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या; संघात निवड न झाल्याची होती खंत

नागपूर: महाराष्ट्राच्या नागपूर शहरातून एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये १७

CWG 2026 : ग्लासगोमध्ये भारताच्या लव्हप्रीत सिंगची ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली शानदार लय

CWG 2026 : ग्लासगो येथे ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सीमा कलिरामानाने पटकावले कांस्य पदक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली चमकदार