CWG 2026 : ग्लासगोमध्ये भारताच्या लव्हप्रीत सिंगची ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली शानदार लय कायम ठेवली आहे. पुरुषांच्या ११०+ किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग प्रकारात भारताचा २८ वर्षीय वेटलिफ्टर लव्हप्रीत सिंग याने अतिशय रोमांचक लढतीत रौप्य पदक आपल्या नावावर केले आहे. विशेष म्हणजे, स्नॅच प्रकारात १७६ किलो वजनाचा राष्ट्रीय/स्पर्धा विक्रम नोंदवत त्याने हे यश मिळवले आहे.



स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत लव्हप्रीत अत्यंत संतुलित आणि आक्रमक खेळ दाखवला. स्नॅचमध्ये १७६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये २१२ किलो असे एकूण ३८८ किलो वजन उचलत त्याने दमदार प्रदर्शन केले. एका वेळेस लव्हप्रीतने न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यू लिट्टीवर तब्बल १५ किलोची मोठी आघाडी घेतली होती, ज्यामुळे तो सुवर्णपदक जिंकेल असे स्पष्ट दिसत होते. मात्र, न्यूझीलंडच्या खेळाडूने आपल्या शेवटच्या प्रयत्नांत जबरदस्त पुनरागमन करत एकूण ३८९ किलो वजन उचलले आणि अवघ्या एका किलोच्या फरकाने लवप्रीतचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.



यापूर्वी २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लव्हप्रीतने कांस्य पदक जिंकले होते. या वेळी आपल्या पदकाचा रंग बदलत त्याने रौप्य पदकास गवसणी घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तसेच, भारताने या स्पर्धेत आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये एकूण ९ पदके (१ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य) पटकावली आहेत. अवघ्या एका किलोने सुवर्णपदक हुकले असले, तरी लवप्रीत सिंगच्या या जिद्दी आणि प्रेरणादायी कामगिरीने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत

Cricket Match-Fixing : कॅनडावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाईंचा राजीनामा

नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १

Joe Root Test Stats : १३ धावा अन् महाविक्रम! जो रूट करणार सचिन तेंडुलकरची बरोबरी ?

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर