चार राज्यांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

पंजाबवरही विशेष लक्ष

नवी दिल्ली  :
भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह चार राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करत संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी वीरेंद्र सचदेवा यांची जागा घेतली आहे. हरियाणामध्ये अर्चना गुप्ता यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल ४३ वर्षांनंतर हरियाणात एखाद्या महिलेची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अर्चना गुप्ता या व्यवसायाने डॉक्टर आहेत.



पंजाबमध्ये सरदार केवल सिंह ढिल्लों यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढिल्लों हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजप संघटना मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. या बदलांमधून भाजप आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये शीख नेतृत्वाला संधी देत भाजपने राज्यातील राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रीत केल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान