करण जोहरला अचानक काय झालं ? शाहरुख, आलिया, करिना अन मनीष मल्होत्रालाही केलं अनफॉलो

Karan Johar : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. करण जोहर सोशल मीडियातही (Social Media) मोठा सक्रीय असतो. मात्र अशातच करण जोहरसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. करण जौहरची चर्चा सध्या इन्स्टाग्राममुळे रंगली आहे.


माहितीनुसार, करण जोहरने आपल्या जवळच्या मित्रांना इन्स्टाग्राममधून अनफॉलो केलं आहे. करणने शाहरुख खानसह आलिया भट्ट, करिना कपूर खान, अनन्या पांडे, मलायका अरोरा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन तसेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला अनफॉलो केलं. फिल्म निर्माता करणने इन्स्टाग्राममधून इतक्या लोकांना अनफॉलो केल्यामुळे सोशल मीडियात या गोष्टीची प्रचंड चर्चा रंगली आहे. मात्र करण सध्या प्रियांका चोप्राला फॉलो करत आहे.



अनफॉलो केल्याच्या प्रकाराला करणने 'डिजिटल डिटॉक्स' असं म्हटलं आहे. तसेच त्यानं या गोष्टीला 'चर्चेचा विषय बनवू नका', असं म्हणत त्यानं 'डिजिटल डिटॉक्स'बाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याची चर्चा झाल्यानंतर करणने यावर प्रतिक्रिया दिली आहे. करणने याविषयी एक इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.


त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की , 'हे एक डिजिटल डिटॉक्स आहे. इन्स्टाग्रामवर कमी वेळ आणि उर्जा खर्च करण्यासाठी मी सर्वांना अनफॉलो करत आहे. याची बातमी होऊ शकत नाही. कृपया चर्चा करण्यासाठी दुसरे काहीतरी शोधा. याचा काहीही संबंध नाही', असं करणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


 
Comments
Add Comment

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका

Samadhan Sarvankar : 'बेबी सरवणकर'चे आगमन! तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर झाले आई-बाबा

मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर