Maharashtra :इंधनटंचाई व पीक कर्जामुळे शेतकरी चिंतेत

मराठवाड्यातील शेतकरी सध्या निसर्गाचा बेभरवसा, डिझेल-पेट्रोलची तीव्र टंचाई, वाढलेले इंधन दर आणि रखडलेली कर्जमाफी अशा अनेकविध संकटांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच मशागतीसाठी लागणारे डिझेल मिळेनासे झाले आहे, तर दुसरीकडे नवीन पीक कर्ज न मिळाल्याने खते आणि बी-बियाणे खरेदी कशी करावी, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे. प्रशासकीय उदासीनता आणि आचारसंहितेची आडकाठी यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, मराठवाड्यात विशेषतः बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंताजनकरीत्या वाढत आहे.

इंधनाचे वाढलेले दर तसेच डिझेल टंचाईमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. यांत्रिकी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना इंधन टंचाईचा फटका बसत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी मे महिना संपत आलेला आहे. अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे नवीन पीक कर्ज मिळत नाही. खरीप हंगाम तोंडावर असल्याने खते, बी-बियाणे खरेदी कशी करावी या
amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थानला जाण्याआधीच जाणून घ्या ! दर्शनाच्या नियमात झालाय मोठा बदल

Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

">चिंतेत शेतकरी आहेत. मराठवाड्यात कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. शेतकरी कुठल्या ना कुठल्या अडचणीत सापडत असल्याने तो निसर्गचक्राला कंटाळला आहे. यामुळे शेतकरी जगण्यापेक्षा मृत्यूला कवटाळत आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शासन सर्वतोपरी प्रयत्न करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. जूनअखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचे मुख्यमंत्र्याकडून स्पष्ट करण्यात आले. शासनाच्या किचकट अटी व अनेक नियमांमुळे ५०% शेतकरी कर्जमाफीच्या लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखाला सत्ताधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं कर्णधारपद धोक्यात; व्यवस्थापनाचा संयम संपला...

Mumbai : तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स सध्या मोठ्या संकटातून जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. ...

मराठवाड्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल २९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती हाती आली आहे. शेतकऱ्यांना विविध अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. वाढलेले कर्ज, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. काही दिवसांपासून मराठवाड्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या अक्षरशः पेट्रोल पंपावर रांगा व हाणामारीचे प्रकार घडत आहेत. हिंगोली व परभणी जिल्ह्यात तर अक्षरशः रात्रभर शेतकऱ्यांना डिझेलसाठी कॅन घेऊन उभे राहावे लागत आहे. डिझेल मिळत नसल्याने यांत्रिकी शेतीचा काहीही फायदा नाही हे लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा बैल जोडी खरेदी करण्यावर भर देत आहेत.
मराठवाड्यात यावर्षी जानेवारी महिन्यापासून एप्रिल अखेरपर्यंत सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात चार महिन्यांत तब्बल ७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. निसर्गाचा बेभरवसा व कर्ज हे दोन आत्महत्येमागील प्रमुख कारणे आहेत. सन २०१२ ते २०१६ या काळात मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे शासकीय दप्तरी असलेल्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थानला जाण्याआधीच जाणून घ्या ! दर्शनाच्या नियमात झालाय मोठा बदल

Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

amp/">

amp/" class="section-post-content-internal-post-title">Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थानला जाण्याआधीच जाणून घ्या ! दर्शनाच्या नियमात झालाय मोठा बदल

Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून ४ महिन्यांत या जिल्ह्यात ७१ शेतकऱ्यांनी फास लावून घेतला आहे. धाराशीव जिल्ह्यात ३९, नांदेड जिल्ह्यात ३३, परभणी जिल्ह्यात २४, हिंगोली जिल्ह्यात १८, जालना जिल्ह्यात २२, लातूर जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांनी अलीकडच्या चार महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याठिकाणी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. बीड जिल्ह्यात चार महिन्यांत तब्बल ७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या असून यापैकी २० शेतकरी शासकीय मदतीस पात्र ठरले आहेत, तर ४५ शेतकऱ्यांची प्रकरणे चौकशीस पात्र आहेत. आठ शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत, तर १९ शेतकऱ्यांना आतापर्यंत शासकीय मदत देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत एकूण ७१ जणांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी २० जणांना शासकीय मदत देण्यात आली, तर उर्वरित ४० प्रकरणे प्रशासकीय स्तरावर चौकशीकरिता प्रलंबित आहेत. यापैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात
आली आहेत.

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थानला जाण्याआधीच जाणून घ्या ! दर्शनाच्या नियमात झालाय मोठा बदल

Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

amp/">
Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थानला जाण्याआधीच जाणून घ्या ! दर्शनाच्या नियमात झालाय मोठा बदल

Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

amp/" class="section-post-content-internal-post-title">Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थानला जाण्याआधीच जाणून घ्या ! दर्शनाच्या नियमात झालाय मोठा बदल

Trimbakeshwar : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी तसेच कुशावर्त स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मागील पाच वर्षांमध्ये चिंताजनकरीत्या वाढले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांपैकी तब्बल ३५ टक्के कुटुंबे शासकीय आर्थिक मदतीपासून वंचित राहत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. प्रशासन, पोलीस आणि महसूल यंत्रणेच्या उदासीनतेचा फटका थेट शेतकरी कुटुंबांना बसत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शासनाकडून विविध योजना, कर्जमाफी, अनुदान आणि मदतीच्या घोषणा होत असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने कृषी धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध कारणांनी अपात्र केलेल्या आत्महत्या कुटुंबांची चिंता वाढवत आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रकरणांमध्ये पोलीस पंचनामा, महसूल चौकशी, कर्जाचा पुरावा किंवा इतर तांत्रिक कारणे पुढे करून कुटुंबांना अपात्र ठरवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी, आधीच कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांवर आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. काही प्रकरणांमध्ये विनाकारण मद्यपी असल्याचा शिक्का देखील मारला जात असल्याची दुर्दैवी परिस्थिती आहे

Nashik Crime News : मुक्या जनावरांचा घासही पुरेना ! गोशाळा अनुदानासाठी लाच मागितली अन उपायुक्त अडकला

Nashik Crime News : गोशाळेला मिळालेल्या अनुदानाचा खर्च योग्य झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क ४१ हजार रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ...

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. राज्यशासन कर्जमाफी करणार असून या विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उशीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेगवेगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी तोंडावर असताना इंधनाचे वाढलेले दर व डिझेल टंचाईचा फटका बसत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची आडकाठी आली, तर शेतकरी नवीन पीक कर्ज घेण्यापासून वंचित राहू शकतो. शेतकरी वर्ग सध्या मशागतीच्या कामात लागलेला आहे; परंतु शेतकरी पूर्णपणे यंत्रावर अवलंबून असल्याने डिझेलचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. इंधनाची कमतरता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यामुळे खरीप हंगामावर चांगलाच परिणाम जाणवणार आहे. शेतमाल बाजारात पोहोचविणे महाग होऊन बसले आहे.

___डॉ . अभयकुमार दांडगे
Tags
dieselmaharshtracng gasprtrolDiesel-petrol

Comments
Add Comment

राज्यसभेचे चित्र लवकरच पालटणार

लोराज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे महत्त्व वाढत आहे. राज्यसभेतील ताकद वाढवायची असेल तर केवळ लोकसभा निवडणुका

मतदारयादीचं पावित्र्य

लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष निवडणुका महत्त्वाच्या आहेत, तितकीच निर्दोष मतदारयादी असणे हे त्या निवडणुकांचे

Keir Starmer : मजूर पक्षाच्या अस्तित्वाचा लढा

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडे प्रचंड बहुमत असले तरी ‘राजकीय विश्वास’ वेगाने संपत चालला आहे.

Nashik :कालिदास’ची दशा केव्हा सुधारणार?

नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेले कालिदास कलामंदिर आज निकृष्ट कामे, प्रशासनाची उदासीनता आणि अपुऱ्या

War : युद्धात भारताची होरपळ

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षाचा फटका भारतातील सामान्य नागरिकांना बसत असून पेट्रोल,

Railway : भारतीय रेल्वेची धडाकेबाज योजना

गेल्या काही वर्षांमध्ये देशात औद्योगिक उत्पादन, कोळसा वाहतूक, बंदरांमधील मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा