Devendra Fadnavis : पुणे विषारी दारू प्रकरणातील एकाही आरोपीला सोडू नका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेत आतापर्यंत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही शहरांत भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून या प्रकरणातील एकाही दोषीला सोडू नका आणि आरोपींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले आहेत.



कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही


वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, "मी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दोन्ही पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. दोन्ही आयुक्तांनी आपसात योग्य समन्वय ठेवून काम करावे आणि मृत्यूच्या नेमक्या कारणांचा तात्काळ शोध घ्यावा," असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.



राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच संपूर्ण यंत्रणा कामाला लावून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने व्हावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क (अबकारी) विभागही पोलिसांच्या सोबतीने मैदानात उतरला असून, संशयित ठिकाणांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सुत्रधार कर्नल विरखा सिंग याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्यासह इतर ८ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व ९ आरोपींवर कायद्यातील अत्यंत कठोर कलमांअंर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले असून, या बेकायदेशीर व्यवसायाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी रात्रीतूनच मोठी मोहीम हाती घेतली आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील