Sumit Antil World Record : पॅरा स्टार सुमित अंतिलचा भालाफेकीत जागतिक विक्रम; स्वतःचाच जागतिक विक्रम मोडत 74.82 मीटरचा थ्रो

Sumit Antil : भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. दुहेरी पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याने स्वतःचाच जागतिक विक्रम मोडला आहे. बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या 8व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुमितने पुरुषांच्या F64 भालाफेक प्रकारात तब्बल 74.82 मीटरचा थ्रो करत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.


पाचव्या प्रयत्नात केला इतिहास


सुमितने स्पर्धेतील पाचव्या प्रयत्नात ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम त्याच्याच नावावर होता. त्याने यापूर्वी 73.29 मीटरचा जागतिक विक्रम केला होता. 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने हा विक्रम केला होता. आता त्याने तब्बल 1.53 मीटरने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.


आज फक्त सर्वोत्तम कामगिरीसाठी मैदानात उतरलो


नवा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर सुमित म्हणाला, बराच काळ मी विचार करत होतो की जागतिक विक्रम का मोडता येत नाही. पण आज मी फक्त माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलो होतो. माझा विक्रम 1.5 मीटरने सुधारल्याचा आनंद आहे.


सातव्यांदा विश्वविक्रमावर नाव


विशेष म्हणजे सुमित अंतिलने आतापर्यंत तब्बल सात वेळा जागतिक विक्रम मोडले आहेत. 2019 मध्ये इटलीमध्ये पहिला विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या सुमितने त्यानंतर दुबई, बेंगळुरू, टोकियो, पॅरिस आणि हांगझोऊमध्ये सातत्याने नवे विक्रम रचले.


टोकियोत एकाच सामन्यात तीन विश्वविक्रम


2021 च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुमितने एकाच अंतिम फेरीत तीन वेळा जागतिक विक्रम मोडत सुवर्णपदक पटकावले होते. त्याने अनुक्रमे 66.95 मीटर, 68.08 मीटर आणि अखेरीस 68.55 मीटरचा थ्रो केला होता.


नीरज चोप्राकडून प्रेरणा


हरियाणातील सोनीपतचा रहिवासी असलेला सुमित ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राकडून प्रेरणा घेत असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. त्याला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


काय असते F64 स्पर्धा?


F64 प्रकारात गुडघ्याखालून पाय गमावलेल्या खेळाडूंचा समावेश असतो. हे खेळाडू कार्बन फायबरच्या कृत्रिम पायाच्या सहाय्याने धाव घेत भालाफेक करतात. या प्रकारात ताकद, संतुलन आणि तंत्र यांची मोठी कसोटी लागते.


पॅरा आशियाई स्पर्धेकडे लक्ष


सुमितने आता आगामी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेकडे लक्ष केंद्रित केले असून, त्यातही यापेक्षा मोठी कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान