IPL 2026 : आयपीएलमधील घडामोडी !

कोहलीने उडवली गुजरातची खिल्ली


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर १ सामन्यात गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी धुव्वा उडवत थेट अंतिम सामन्यात धडक मारली आहे. धरमशाला येथील मैदानावर मिळालेल्या या ऐतिहासिक विजयानंतर बंगळूरुच्या संघात आनंदाचे वातावरण होते. यावेळी मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला चिडवण्यापासून ते विजयानंतर पत्नी अनुष्का शर्माला मारलेल्या मिठीपर्यंतचे त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सामन्यादरम्यानची एक मजेशीर घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुजरात टायटन्सचा संघ एका बाजूला या हंगामासाठीचे फोटोशूट करत होता. त्याच वेळी विराट कोहली पॅड घालून बाऊंड्रीलाईन जवळ उभा होता. गुजरातच्या खेळाडूंना पाहताच विराटने मस्करीच्या मूडमध्ये त्यांच्या दिशेने हात करत 'नागासारखा' आकार हलवला. 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या शोमुळे प्रसिद्ध झालेली ही 'बाबाजी का ठूल्लू'ची स्टेप करत विराटने गुजरातच्या खेळाडूंना मस्करीत चिडवण्याचा प्रयत्न केला. तसेच सामन्यानंतर त्याने अनुष्का शर्मा हिला घट्ट मिठी मारली.




'जय-वीरू' जोडी पुन्हा एकत्र


बंगळूरु संघाच्या विजयानंतर मैदानावर एक असा क्षण पाहायला मिळाला, ज्याने जगभरातील आरसीबी चाहत्यांचे डोळे पाणावले. बंगळूरुचा माजी दिग्गज फलंदाज आणि विराट कोहलीचा जिगरी दोस्त एबी डिव्हिलियर्स आरसीबीला पाठिंबा देण्यासाठी थेट स्टेडियममध्ये हजर होता. संघ जिंकताच डिव्हिलियर्स मैदानावर पोहोचला आणि विराट-डिव्हिलियर्सने एकमेकांना मारलेली घट्ट मिठी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एबी डिव्हिलियर्सने २०११ ते २०२१ या काळात आरसीबीसाठी अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. या ११ वर्षांच्या प्रवासात विराट आणि एबीने मैदानावर अनेक ऐतिहासिक भागीदारी रचल्या आणि त्यांची मैत्री क्रिकेट जगतात 'जय-वीरू'सारखी घट्ट झाली. २०२१ मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर डिव्हिलियर्स जरी समालोचकाच्या भूमिकेत दिसत असला, तरी आरसीबीवरील आणि विराटवरील त्याचे प्रेम तीळमात्र कमी झालेले नाही. या महत्त्वाच्या सामन्यात डिव्हिलियर्स आरसीबीला चीअर करत होता. बंगळूरुने गुजरातचा ९२ धावांनी धुव्वा उडवताच डिव्हिलियर्स खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानात उतरला. विराटला पाहताच त्याने त्याला घट्ट मिठी मारली.




"माझं नाव विसरला भाऊ!"


आरसीबीच्या विजयानंतर संघाचे मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिकने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. "हा एक व्यावसायिक आणि चॅम्पियन्ससारखा खेळ होता," अशा शब्दांत कार्तिकने संघाचा आत्मविश्वास वाढवला. दरम्यान, याच भाषणादरम्यान देवदत्त पडीक्कल आणि कृणाल पांड्या यांच्यात घडलेल्या एका मजेशीर किस्स्यामुळे विराट कोहलीसह संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये एकच हशा पिकला. सामन्यानंतर आरसीबीने सोशल मीडियावर ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दिनेश कार्तिकनंतर युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करत होता. मात्र, भाषण संपवताना तो अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याचे नाव घ्यायला विसरला. त्याच वेळी कृणालने मध्येच टोकले आणि म्हणाला, "मेरा नाम भूल गया भाई!" . यावर दिनेश कार्तिकने तात्काळ परिस्थिती सांभाळत, "वेल डन कृणाल, तुझी फलंदाजी उत्तम होती," असे म्हणताच विराट कोहलीसह संपूर्ण खोलीतील खेळाडू पोट धरून हसू लागले.


Comments
Add Comment

World Chess Championship : गुकेश आणि सिंदारोव्ह यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत जिनिव्हामध्ये रंगणार

नवी दिल्ली : विद्यमान जागतिक विजेता गुकेश डी आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील २०२६ ची जागतिक

ISSF World Cup : सोनम आणि हिमांशूला १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक

हाँगझोऊ : चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय रायफल नेमबाज सोनम उत्तम मस्कर आणि

Valluri Ajaya Babu : कोण आहे वल्लुरी अजय बाबू ? आधी वडिलांनी जिंकले पदक , १६ वर्षानंतर मुलाने बापाला टाकले मागे

ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आतापर्यंत १० पदके जिंकली आहेत. यात

IND VS SL : बीसीसीआयची मोठी घोषणा! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात ऑगस्टमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय

CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या सर्वेशची चमक! उंच उडीत भारताला जिंकून दिले पहिले रौप्य पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे खेळला जात आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी

CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ वेटलीफटिंगमध्ये भारताचा दबाब कायम; माणिपूरच्या बिंद्यारानीने सलग दुसर्‍यांदा जिंकले पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १० पदक जिंकले आहेत.