संजय राऊतांनी वाईन घेतल्यासारखे झिंगून बोलू नये



भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची सणसणीत टीका


उन्हाळा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात किराणा दुकानांवर वाईनविक्री करण्याची परवानगी द्या, असा प्रस्ताव कोणी आणला होता याची आठवण राहिलेली नाही. त्यात संजय राऊत यांच्या संबंधातील कंपनी कुणाची होती, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. तुमचे धोरण वाईन प्या असे होते, तर पंतप्रधानांचे धोरण पाणी प्या असे आहे. त्यामुळे ‘पाणी प्या’ म्हटल्यानंतर वाईन प्यायल्यासारखे बोलू नये, अशी बोचरी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत  बन बोलत होते.अलीकडच्या काळात संजय राऊतांना वडापाव नव्हे तर खिमा-पाव अधिक प्रिय वाटायला लागलाय. कारण खिमा-पाव खाल्ल्यानंतर खिमा-पाव खाणारे आपल्याला मतदान करतील, असे त्यांना वाटतेय. मत्स्य पावच्या द्वारे कोकणातील कोळी बांधवांसाठी उत्पन्नवाढीची नवी संधी निर्माण केली जात असेल, तर संजय राऊतांच्या पोटात दुखायचे कारण काय, असा सवाल उपस्थित करून  बन म्हणाले की, तुम्ही कितीही दाढ्या कुरवाळल्या, अफजलखान आणि औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही. कोळी आणि कोकणी बांधव तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

संजय राऊतांनी बळी देण्याचे समर्थन केले. बकरी ईदच्या निमित्ताने बळी देण्यास आमचा विरोध नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी बळी द्यायला निश्चितपणे विरोध केला जाईल. तुम्हाला बळी द्यायचा असेल तर तुमचा सण घरामध्ये साजरा करा, त्याला आमचा विरोध नाही. परंतु मतांसाठी लांगूलचालन करण्यासाठी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये बकऱ्यांचे बळी देण्याचे समर्थन दुर्दैवाने जनाब संजय राऊत करत आहेत. आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी संजय राऊतांच्या पेकाटात लाथ घातली असती. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने अशा प्रथा-परंपरांना विरोध केला होता. त्यांनी कधीही उघड्यावर नमाज पढणे, किंवा उघड्यावर बळी देणे अशा परंपरेचे समर्थन केले नव्हते याकडे श्री. बन यांनी लक्ष वेधले. बन पुढे म्हणाले, रोहित पवार यांनी आपल्या आजोबांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची स्थिती काय होती, याचा थोडासा अभ्यास करावा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारावे. आपले आजोबा शरद पवार यांना एकदा विचारले पाहिजे की, ‘आजोबा, तुम्ही दहा वर्ष देशाचे कृषिमंत्री होता तेव्हा महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या का होत होत्या? तुम्ही दहा वर्ष केंद्रात मंत्री होता, तरीही कांद्याचा प्रश्न का सुटला नाही. काँग्रेस सरकारने कधीही कांद्याला 15 रुपयांचा हमीभाव दिला नाही. आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत तोडगा निघाला. येत्या चार दिवसांमध्ये कांद्याचा प्रश्न संपलेला असेल.



भारताकडे पुरेसा इंधनसाठा शिल्लक असल्याचे स्पष्ट करत श्री. बन म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक डिझेल - पेट्रोलचा साठा करत असल्याने काही जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा 50 ते 75 टक्के मागणी वाढलेली आहे. कारण काहीजण साठेबाजी करून पेट्रोल - डिझेलचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहिला प्रश्न इंधन दरवाढीचा, तर चीनमध्ये जवळपास 25 ते 30 टक्के इंधन दरवाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे आपल्याकडे केवळ चार ते पाच टक्केच इंधन दरवाढ झाली आहे. युद्धाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे दर पुन्हा नियंत्रणात येतील. सर्वसामान्य नागरिकांना झळ बसू नये यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय