NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. २१ जून रोजी होणारी NEET फेरपरीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय आणि अत्यंत सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सरकारने थेट भारतीय लष्कर आणि वायूदलाची मदत घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (NEET Paper Leak 2026)


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका सुरक्षित आणि गुप्त पद्धतीने पोहोचवण्यासाठी भारतीय वायूदलाच्या विशेष विमानांचा वापर करण्यात येणार आहे. तर परीक्षा प्रक्रियेत सुरक्षेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाणार आहे.
(NEET Paper Leak 2026)



दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; सुरक्षेवर सखोल चर्चा :


या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीमध्ये अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. (NEET Paper Leak 2026)


बैठकीत २१ जूनच्या फेरपरीक्षेच्या संपूर्ण नियोजनासह सुरक्षा व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रश्नपत्रिका छपाईपासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (NEET Paper Leak 2026)



परीक्षा ‘फुलप्रूफ’ करण्यासाठी कठोर उपाय :


नीट परीक्षेतील वाढत्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास डळमळीत झाला होता. त्यामुळे यावेळी परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ‘फुलप्रूफ’ करण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना आखल्या आहेत. (NEET Paper Leak 2026)


संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात केली जाणार असून, सीसीटीव्ही मॉनिटरिंग, डिजिटल ट्रॅकिंग आणि बहुस्तरीय सुरक्षा तपासणी केली जाईल. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष तांत्रिक यंत्रणाही वापरण्यात येणार आहे. (NEET Paper Leak 2026)



विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्याचे मोठे आव्हान :


नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातून केंद्र सरकार आणि एनटीएवर जोरदार टीका झाली होती. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याच्या आरोपांनंतर आता केंद्र सरकार स्वतः या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालत असल्याचे दिसून येत आहे. लष्कर आणि वायूदलाच्या थेट सहभागामुळे प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता, परीक्षा केंद्रांवरील नियंत्रण आणि संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता वाढणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. (NEET Paper Leak 2026)



सीबीआयचा तपास वेगात; आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी :


दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासही वेगाने सुरू आहे. मुख्य संशयित आरोपी शिवराज मोटेगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित बँक खाती आणि लॉकर्सची तपासणी आता सीबीआयकडून करण्यात येत आहे. सीबीआयच्या पथकाकडून मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार, रोख रक्कम, डिजिटल पुरावे आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांचा शोध घेतला जात आहे. या आंतरराज्यीय पेपर लीक रॅकेटमधील पैशांच्या व्यवहारांबाबत महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (NEET Paper Leak 2026)

Comments
Add Comment

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय