Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक कुंभमेळा कामांना मिळणार गती, कुंभमेळ्यासाठी ६,१६२ कोटींच्या कामांना मंजूरी

Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. कुंभमेळ्यात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोट्यवधींच्या कामांचा धडाका नाशिक महापालिकेने लावला आहे. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी ६,१६२ कोटींच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे विकास कामांना अधिक गती मिळेल.



'ही' कामे मार्गी लावली जाणार


कुंभमेळ्यासाठी मंजूर झालेल्या ६,१६२ कोटींच्या कामांमध्ये प्रामुख्याने घाट बांधणी, जोडरस्ते, रिंगरोड, जलशुद्धीकरण केंद्र, सीसीटीव्ही बसविणे, पूल बांधणी, पावसाळी गटाराची कामे, विद्युत वाहिन्या, ऑप्टिकल फायबर पाईप टाकणे, वाढीव पाणीपुरवठा आदी ६८ प्रकारची कामे मार्गी लावली जाणार आहेत.



कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकवरील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन (Solid waste management), आरोग्य सुविधा, विद्युत पुरवठा, सुरक्षा व्यवस्था आदी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण येणार आहे. त्याकरिता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) कुंभमेळ्याकरिता दोन टप्प्यांमध्ये ६८ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले होते.


यात वाहतुकीच्या नियोजनाकरिता रेल्वे, महामार्गाला जोडणारे रस्ते प्रामुख्याने बांधले जाणार आहेत. याशिवाय गोदावरीच्या घाटाकडे (Godavari Ghat) जाणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्याकरिता अनेक ठिकाणी वाहनतळ उभारली जाणार आहेत. या वाहनतळांना प्रमुख ठिकाणांशी जोडणारे रस्ते विकसित केले जातील.


घाट बांधणी आणि दुरूस्तीकरिताही मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याकरिता व जलशुद्धीकरणाकरिता सुमारे ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर सुरक्षेकरिता सर्वत्र बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेकरिता सुमारे ३७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.



ओझर विमानतळासाठी ५७२ कोटी


नाशिकमधील ओझर विमानतळ (Ozar Airport) विकासाकरिता ५७२ कोटी खर्चण्यात येणार आहेत. तर त्र्यंबकेश्वर परिसरातील पाणीसाठे पूर्णपणे भरण्याकरिता आणि गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित राहण्याकरिता गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजनेकरिता सुमारे ३२९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बहुतांश कामे नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआयडीसीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.


 
Comments
Add Comment

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक