स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुक : २०२६ ;अमरावतीमधून प्रवीण पोटे यांना भाजपची उमेदवारी

भाजपाने अमरावती मतदारसंघात प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे


त्यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचे नेतृत्व केले असून राज्याचे पर्यावरण, खाणकाम, उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहे


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, भाजपने गुरुवारी अमरावती मतदारसंघातून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. ठाणे, पुणे, कोकणसह अनेक जागांवरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अद्यापही रस्सीखेच कायम असतानाच, भाजपने आपली पहिली अधिकृत उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे.राज्यातील एकूण १७ जागांपैकी तब्बल १४ मतदारसंघांमध्ये भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ मजबूत असल्याने पक्ष सध्या महायुतीत ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला ४ जागांची ऑफर देण्यात आली आहे, मात्र उपमुख्यमंत्री शिंदे ६ जागांच्या मागणीवर ठाम असल्याने जागावाटपाचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने अमरावतीची जागा स्वतःकडे ठेवत प्रवीण पोटे पाटील यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, प्रवीण पोटे पाटील हे शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता राज्याचे महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.





प्रवीण पोटे यांनी यापूर्वीही विधानपरिषदेत अमरावती मतदारसंघाचे नेतृत्व केले असून, त्यांचा या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींशी दांडगा संपर्क आहे. २०१४ ते २०१९ या युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे उद्योग, खाणकाम, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले होते. याच कार्यकाळात त्यांच्याकडे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांचा हाच मोठा प्रशासकीय आणि राजकीय अनुभव लक्षात घेऊन भाजपने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री