ICC : बांगलादेशी खेळाडूंची आयसीसी क्रमवारीत झेप

ढाका (वृत्तसंस्था) :


पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर २-० अशी कसोटी मालिका जिंकत शानदार कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नव्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.



अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम यांनी मालिकेत सर्वाधिक २५९ धावा करत कसोटी फलंदाजी क्रमवारीत तब्बल दहा स्थानांची झेप घेत संयुक्त १६वे स्थान मिळवले. त्याचबरोबर लिटन दास यानेही २३९ धावांच्या जोरावर १४ स्थानांची प्रगती करत २४वे स्थान पटकावले.



कसोटी गोलंदाजीत डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लाम दोन स्थानांनी वर चढून ११व्या स्थानी पोहोचला असून त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम गुणांकनही मिळवले. मेहदी हसन मिराज याने २५वे स्थान मिळवले. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही तैजुल इस्लामने तीन स्थानांची प्रगती करत २९वे स्थान मिळवले. मालिका गमावूनही पाकिस्तानसाठी एक सकारात्मक बाब म्हणजे वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद याने पुनरागमन करत कसोटी गोलंदाजी क्रमवारीत ४९वे स्थान मिळवले. दरम्यान, एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतही बदल पाहायला मिळाले. नेपाळचा यष्टीरक्षक फलंदाज आसिफ शेख पाच स्थानांनी वर चढला, तर अष्टपैलू दिपेंद्र सिंग ऐरी आठ स्थानांनी प्रगती करत संयुक्त ९१व्या स्थानी पोहोचला.


Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव