'Conference League' : 'कॉन्फरन्स लीग'च्या अंतिम सामन्यापूर्वी राडा !

जर्मनीत इंग्लंड-स्पेनचे फुटबॉल चाहते भिडले


लाइपझिग (वृत्तसंस्था):


युरोपियन कॉन्फरन्स लीगच्या ऐतिहासिक अंतिम सामन्यापूर्वी जर्मनीतील लाइपझिग शहराला हिंसक गालबोट लागले आहे. इंग्लंडचा 'क्रिस्टल पॅलेस' आणि स्पेनचा 'रायो वॅलेकॅनो' यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या राड्यामुळे सामन्यापूर्वी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रेस्टॉरंटबाहेर क्रिस्टल पॅलेसचे चाहते बसले असताना अचानक सुमारे ३०० रायो वॅलेकॅनो समर्थकांचा गट तिथे धडकला. दोन्ही गटांतील शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच हिंसक संघर्षात झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काचेच्या बाटल्या, बिअरचे ग्लास आणि रेस्टॉरंटमधील खुर्च्यांची फेकाफेक केली. यानंतर दुसऱ्या एका घटनेत ६० क्रिस्टल पॅलेस समर्थकांनी स्पॅनिश चाहत्यांना पुन्हा चिथावणी दिल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जर्मन पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. या मोहिमेत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी तात्काळ

">दोन दंगलखोरांना ताब्यात घेतले आहे. तसेच संशयित ३०० हून अधिक लोकांची ओळख पटवून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, क्रिस्टल पॅलेस आणि रायो वॅलेकॅनो हे दोन्ही संघ आपल्या फुटबॉल इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या युरोपीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समोरासमोर येत आहेत. क्रिस्टल पॅलेसचे मुख्य प्रशिक्षक ऑलिव्हर ग्लास्नर यांच्यासाठी क्लबमधील हा अखेरचा सामना असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे.



क्रिस्टल पॅलेसने हा सामना जिंकल्यास युरोपीय फुटबॉलवर इंग्लंडच्या क्लबांचे ऐतिहासिक वर्चस्व प्रस्थापित होईल. यंदाच्या हंगामात अॅस्टन व्हिलाने आधीच युरोपा लीगवर नाव कोरले आहे, तर दुसरीकडे, आगामी शनिवारी होणाऱ्या सर्वात मोठ्या 'चॅम्पियन्स लीग' अंतिम सामन्यात आर्सेनल संघ पॅरिस सेंट-जर्मन विरुद्ध मैदानात उतरणार आहे.


Tags
matchenglandfootballgermanyfootball matchConference leaguecristal palace
Comments
Add Comment

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह