Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संघटनेने अर्थात FWICE ने स्पष्टीकरण अर्थात एक खुलासाच दिला आहे. ‘डॉन 3’ चित्रपटासाठी रणवीर निश्चित झाला होता, या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर आधीच ४५ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र रणवीर अचानक चित्रपटातून बाहेर पडला. त्यामुळे फरहानने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) कडे तक्रार दाखल केली. FWICE ने 'असहकार निर्देश' जारी केला आहे. ही बंदी नसून, सदस्यांना रणवीरसोबत काम न करण्याचे आवाहन आहे, असे अशोक पंडित म्हणाले. ते FWICE चे पदाधिकारी आहे. कोणत्याही अभिनेत्यावर कायदेशीर बंदी घालण्याचा अधिकार संस्थेला नाही. मात्र FWICEने चित्रपट उद्योगातील विविध क्षेत्रांतील कामगारांसाठी नॉन-कोऑपरेशन (असहकार )निर्देश जारी केले आहेत, असेही ते म्हणाले.





एका चित्रपटाचे काम सुरू झाले होते. रणवीरसोबतच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे ४५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता, असे दिग्दर्शक फरहानने सांगितले. या टप्प्यावर अचानक रणवीरने माघार घेतली आहे. या पद्धतीने कोणताही कलाकार आयत्यावेळी निर्णय बदलणार असेल तर निर्मात्याचे प्रचंड नुकसान होईल. एखाद्यावर आत्महत्येचीच वेळ येईल. त्यामुळे ही पद्धत थांबली पाहिजे. व्यावसायिकता जपली पाहिजे.

माघार घेणाऱ्याने चर्चा करून निर्मात्याचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती भरपाई देऊन तोडगा काढणे आवश्यक आहे. फरहान अख्तर आणि रणवीरने परस्पर चर्चा केली आणि मार्ग काढला तर FWICE त्याचे स्वागत करेल. पण कोणाचेही नुकसान कलाकाराने मधूनच चित्रपट सोडू नये. प्री प्रॉडक्शनवर ४५ कोटींचा खर्च झाला असताना अचानक चित्रपट सोडणे योग्य नाही, असे अशोक पंडित म्हणाले.
Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत