Ebola virus : युगांडामधून बंगळुरूमध्ये आलेल्या महिलेत आढळली 'इबोला व्हायरस'ची लक्षणे ; रक्ताचे नमुने पाठवले पुण्यात !

इबोला व्हायरस २०२६ : युगांडा आणि काँगोसह अनेक आफ्रिकन देशात इबोला संसर्गाची (Ebola Virus) प्रसारण सातत्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान युगांडावरुण बंगळुरूमध्ये परतलेल्या महिलेत युगानंदा व्हायरस असल्याचे समोर येत आहे. खबरदारी महणून महिलेला बंगळुरू शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पण ही लक्षणे इबोला व्हायरसची आहे या महितील अजूनही शाश्वती मिळाली नाही. तपासणी साठी तीचे रक्ताचे नमुने पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' (NIV) कडे पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवलाची (Blood Reports) ची प्रतीक्षा केली जात आहे.




इबोला व्हायरस चा भारतात प्रवेश ?


मिळालेल्या माहितीनुसार, युगांडाहून प्रवास करून आलेल्या या महिलेला बंगळुरूच्या शासकीय रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या महिलेला किरकोळ स्वरुपात अंगदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. सध्या महिलेची प्रकृती सामान्य असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सरकारने स्पष्ट केले आहे की भारतात अद्याप इबोला व्हायरसये एकही प्रकरण समोर आलेले नाही. आफ्रिकन देशांमधील इबोलाचा प्रभाव पाहता, कर्नाटक आरोग्य विभागाने प्रभावित देशांमधून प्रवास करून परतणाऱ्या नागरिकांना पुढील 21 दिवसांपर्यंत आरोग्य देखरेख (Quarantine) आणि स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.




घाबरून जाऊ नका, सरकारचे आवाहन :-


भारत सरकार इबोला व्हायरसच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारे मिळून देखरेख ठेवत असून आवश्यक आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. विमानतळ आणि इतर प्रवेशद्वारांवर (Entry Points) प्रवाशांचे स्क्रीनिंग आणि देखरेख सुरू आहे. सरकारने जनतेला न घाबरण्याचे आणि कोणत्याही अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. लोकांना केवळ सरकारी आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


बंगळुरूमधील 'राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसीजेस' (RGICD) ला आयसोलेशन सेंटर म्हणून निश्चित करण्यात आले आहे, तर महामारी रोग रुग्णालयाला क्वारंटाइन(Quarantine) आणि उपचार केंद्र म्हणून घोषित केले आहे. मंगळुरूमधील 'न्यू मंगळुरू पोर्ट अथॉरिटी' (NMPA) अंतर्गत येणाऱ्या 'श्रीनिवास पोर्ट हॉस्पिटल'ला क्वारंटाइन सेंटर म्हणून निश्चित केले आहे, तर वेनॉक जिल्हा रुग्णालयाला आयसोलेशन आणि उपचार केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.




WHO (World Health Organization) ने केले सतर्क :-


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १७ मे रोजी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि युगांडामध्ये पसरत असलेल्या इबोला आजाराच्या (Erectile Dysfunction) प्रादुर्भावाला "आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी" (PHEIC) घोषित केले आहे. आफ्रिकन देशांमध्ये इबोला व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे काँगोमध्ये समोर येत आहेत. काँगोमध्ये आतापर्यंत इबोलाचे १०१ पॉझिटिव्ह रुग्ण आणि ९०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला