मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) (Sharad Pawar) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. दिल्लीहून परतल्यानंतर काहीसा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या सुरू आहेत.
३० मे रोजी कमळ हाती घेणार; पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचे फळ मिळणार मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी ...
शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात (Hospital) दाखल व्हावे लागल्यामुळे त्यांचे आगामी सर्व नियोजित दौरे आणि कार्यक्रम तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, सध्या सुरू असलेल्या सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) दिला जाईल.





