श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त उरुळी स्थानकावर १६ गाड्यांना तात्पुरता थांबा

उरुळी : जून २०२६ मध्ये उरुळी येथे होणाऱ्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त भाविकांच्या प्रवासाची सोय व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने उरुळी स्थानकावर १६ गाड्यांना एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महोत्सवाचा मुख्य दिवस २ जून २०२६ रोजी असून, विविध मार्गांवरील महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना हा विशेष थांबा देण्यात येणार आहे.


गाडी क्रमांक १२७७९ वास्को-द-गामा – हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस उरुळी येथे पहाटे ५.०० वाजता तर गाडी क्रमांक १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेस सायंकाळी ४.१५ वाजता थांबेल. या दोन्ही गाड्यांना २७ मे ते ५ जून २०२६ या कालावधीत तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.गाडी क्रमांक १२७८१ म्हैसूर – हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस ६ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता, तर गाडी क्रमांक १२७८२ हजरत निजामुद्दीन – म्हैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस २६ मे व २ जून रोजी पहाटे ५.३० वाजता उरुळी येथे थांबणार आहे.



गाडी क्रमांक २२६८५ यशवंतपूर – चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस ४ व ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता, तर गाडी क्रमांक २२६८६ चंदीगड – यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस २७ व ३१ मे रोजी सकाळी १०.२२ वाजता उरुळी येथे थांबेल.गाडी क्रमांक १२६२९ यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस ३ व ५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता, तर गाडी क्रमांक १२६३० हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस २८ व ३० मे रोजी सकाळी १०.२० वाजता उरुळी येथे पोहोचेल.


गाडी क्रमांक १२१४७ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस २ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता, तर गाडी क्रमांक १२१४८ हजरत निजामुद्दीन – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर एक्सप्रेस २९ मे रोजी पहाटे ५.३० वाजता थांबेल.गाडी क्रमांक १५०३० पुणे – गोरखपूर एक्सप्रेस ६ जून रोजी सकाळी ११.४० वाजता, तर गाडी क्रमांक १५०२९ गोरखपूर – पुणे एक्सप्रेस २९ मे रोजी रात्री १.१५ वाजता उरुळी येथे थांबणार आहे.गाडी क्रमांक १२१०४ लखनऊ जंक्शन – पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस २८ मे रोजी सायंकाळी ५.०४ वाजता, गाडी क्रमांक ११४०७ पुणे – लखनऊ जंक्शन एक्सप्रेस २ जून रोजी रात्री १०.१५ वाजता आणि गाडी क्रमांक ११४०८ लखनऊ जंक्शन – पुणे एक्सप्रेस २९ मे रोजी सकाळी १०.०० वाजता उरुळी येथे थांबेल.तसेच गाडी क्रमांक १२१२९ पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस ३ जून रोजी सायंकाळी ६.५० वाजता उरुळी येथे थांबणार आहे.



याशिवाय, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी २, ३ आणि ४ जून २०२६ रोजी उरुळी येथे उघडण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक ११०७७ पुणे – जम्मू तवी झेलम एक्सप्रेसमध्ये एक सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डबा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांनी या तात्पुरत्या थांब्यांची नोंद घेऊन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी