Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात झाला. उन्नाव (Unnao) जिल्ह्यातील औरास परिसरात दिल्लीहून बिहारकडे जाणारी वेगवान स्लीपर बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत बिहारमधील एका पोलिस अधिकाऱ्यासह कैद्याचा आणि इतर प्रवाशांचा मिळून एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Uttar Pradesh Road Accident)



चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज :


प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडला. बसचा चालक झोपेच्या आहारी गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातावेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असल्यामुळे अचानक बस पलटी झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बस डिव्हायडरवर आदळल्यानंतर काही प्रवासी थेट खिडक्यांमधून बाहेर फेकले गेले. अनेक जण एक्सप्रेसवेच्या खालील खंदकात पडल्याने बचावकार्य अधिक कठीण बनले. (Uttar Pradesh Road Accident)



मृतांमध्ये पोलिस अधिकारी आणि कैद्याचा समावेश :


या अपघातात बिहारचे पोलिस अधिकारी रामचंद्र आणि कैदी छत्रपाल यांचाही मृत्यू झाला आहे. पोलिस अधिकारी रामचंद्र हे कैदी छत्रपालला चौकशीसाठी दिल्लीला घेऊन गेले होते आणि जबाब नोंदवल्यानंतर त्याला पुन्हा बिहारला घेऊन जात असताना हा भीषण अपघात घडला. (Uttar Pradesh Road Accident)



घटनास्थळी बचावकार्याची धावपळ :


अपघाताची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या अनेक प्रवाशांना पुढील उपचारांसाठी लखनऊ (Lucknow) येथील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. (Uttar Pradesh Road Accident)



वाहतूक काही काळ विस्कळीत :


अपघातानंतर आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यूपीडा आणि पोलिसांच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. (Uttar Pradesh Road Accident)


दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेन्द्र लाल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेनंतर पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या बस चालकांच्या कामाच्या तासांवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Uttar Pradesh Road Accident)

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून