Engine Oil : गाड्यांच्या वापरलेल्या ऑईलचा पुनर्वापर करणार

मुंबई : भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'टाटा मोटर्स' आणि सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज तेल कंपनी 'हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि कचरा व्यवस्थापनाला नवी दिशा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गाड्यांमध्ये वापरून खराब झालेल्या ऑईलचे संकलन करून त्याचा सुरक्षित पुनर्वापर करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या उपक्रमांतर्गत भारतात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ‘चक्रीय अर्थव्यवस्था मॉडेल’ विकसित केले जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरणाची हानी टळणार आहे.खराब ऑईलचे रूपांतर होणार उच्च दर्जाच्या इंधनात!


सध्या गाड्यांमधून काढलेले जुने आणि काळे झालेले ऑईल अनेकदा उघड्यावर किंवा पाण्यात सोडले जाते, ज्यामुळे पाण्याचे आणि जमिनीचे प्रचंड प्रदूषण होते. मात्र, आता या करारामुळे वापरलेल्या या तेलाचे संकलन, साठवणूक आणि वाहतूक करण्यासाठी एक संपूर्ण संघटित आणि ट्रॅक करण्यायोग्य (डिजिटल) यंत्रणा तयार केली जाईल. हे खराब तेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पुनर्प्रक्रिया करून पुन्हा उच्च दर्जाच्या बेस ऑईलमध्ये रूपांतरित केले जाईल, जे पुन्हा गाड्यांसाठी वापरता येऊ शकेल. कंपंनी प्रमुख्यांच्या म्हणण्यानुसार "वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हे कार्बन फूटप्रिंट (प्रदूषण) कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. टाटा मोटर्ससोबतच्या या भागीदारीमुळे देशात खऱ्या अर्थाने नैसर्गिक संसाधनांची बचत होईल.


या संपूर्ण प्रक्रियेत दोन्ही कंपन्यांनी आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. यात टाटा मोटर्स आपल्या देशभरातील अधिकृत सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून गाड्यांमधून निघणारे जुने ऑईल गोळा करण्यास मदत करेल. तर एचपीसीएल आपल्या अधिकृत संकलन यंत्रणेद्वारे या वापरलेल्या लुब्रिकंट्सचे संकलन करून ते प्रक्रिया केंद्रापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवेल. सुरुवातीला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर देशातील काही निवडक राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे मॉडेल संपूर्ण देशभरात लागू केले जाईल, ज्यामुळे भारताच्या 'हरित क्रांती'ला मोठे बळ मिळणार आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Ethanol Free Petrol Finder : इथेनॉलमुक्त पेट्रोल हवंय? घरबसल्या असा शोधा तुमच्या जवळचा पंप!

नवी दिल्ली : देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर सध्या E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. केंद्र

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची