Nashik : नाशिकमध्ये मद्यधुंद चालकाचा अंगावर काटा आणणारा थरार; कार थेट गोदावरी पात्रात उतरवली

Nashik : नाशिकमधील पंचवटी परिसरात एका मद्यधुंद कार चालकाचा थरार पहायला मिळाला आहे. टाळकुटेश्वर मंदिराच्या अलीकडे असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात या मद्यधुंद चालकाने आपली चारचाकी गाडी थेट गोदावरीच्या पात्राच्या आत घुसवली. हा परिसर भाविक आणि पर्यटकांमुळे नेहमी गजबजलेला असतो मात्र सुदैवाने या वेळेस तितकीशी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज मंगळवारी (दि. २६) ही घटना घडली. चालक प्रचंड मद्याच्या नशेत होता, त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीपात्रात जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून मद्यपी चालकावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



नदीपात्र परिसरात भाविक आणि नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, अपघात झाला त्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

Comments
Add Comment

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता