Revenue Department : लोकांना सेवा देण्यात महसूल विभाग राज्यात सर्वोत्कृष्ट

मुंबई : राज्यातील जनतेला देण्यात येणाऱ्या प्रशासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राबविण्यात आलेल्या 'गव्हर्नन्स प्रोसेसिंग री-इंजिनिअरिंग' (GPR) फेज-२ च्या आढावा बैठकीत महसूल विभागाने राज्यात अव्वल दर्जा पटकावला.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये महसूल विभागाच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागाचे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.



सेवांचे सुलभीकरण व वेळेची बचत


महसूल विभागामार्फत सध्या 'सेवा हक्क कायद्यांतर्गत' एकूण ५४ सेवा पुरविल्या जातात. यामध्ये महसूल विभागाच्या २० सेवा, नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या २० सेवा आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या १४ सेवांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने या सर्व सेवांचे 'GPR' म्हणजेच प्रशासकीय सुलभीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.



या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात (फेज-१) अर्जांचे नमुने अत्यंत सुटसुटीत करण्यात आले असून, अनावश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, फाईल मंजुरीसाठी लागणारे प्रशासकीय टेबल (कार्यासन मंजुरीचे स्तर) कमी केल्यामुळे सामान्य नागरिकांना अत्यंत कमी वेळेत आणि जलदगतीने दाखले व प्रमाणपत्रे मिळणे सुरू झाले आहे. अल्पभूधारक, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत, प्रतिज्ञापत्र साक्षांकीत करणे, उत्पन्न प्रमाणपत्र, भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (शपथपत्रासह), नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (शपथपत्राविना), ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र या सेवांचा समावेश आहे.


सर्वसमावेशक अभ्यास गटाचे यश


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने या सुलभीकरणाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. हे मॉडेल तयार करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, समग्र संस्था, मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी आणि क्षेत्रीय पातळीवरील महसूल संवर्गातील विविध अधिकारी यांच्या अभ्यास गटाने एकत्रितपणे काम केले, ज्यामुळे हा प्रशासकीय बदल यशस्वी ठरला.


१४ ऑगस्ट २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होणार होणार असून यामध्ये उर्वरित सेवांच्या सुलभीकरणाची प्रक्रिया आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावण पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक