NEET Paper Leak Case : 'गॉड' कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या फोनमधील नंबरमुळे वाढलं गूढ!

लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा हवालदार हिच्या अटकेनंतर तपासाचा वेग वाढला असून, आता तिच्या पतीच्या मोबाईलमधील 'गॉड' (God) नावाने सेव्ह केलेल्या एका संशयास्पद नंबरमुळे नवीनच गूढ निर्माण झाले आहे. या नंबरमागे नेमकं कोण आहे, याचा शोध केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) घेत आहे.


CBI च्या तपासात असे समोर आले आहे की, अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदारने NEET परीक्षेच्या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच काही विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून दिले होते. त्याबदल्यात लाखो ते कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. दरम्यान, मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने सेव्ह असलेल्या संपर्कासोबतचे काही संशयास्पद संभाषण CBI च्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या चॅटमधून पेपरफुटी रॅकेटमधील मोठी नावे आणि सूत्रधार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



NTA अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पेपरफुटी?


तपासादरम्यान मनीषा हवालदारने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मधील एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून प्रश्नपत्रिका लीक केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच संबंधित विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात हवालदार, वाघमारे आणि मांढरे यांच्यातील संशयास्पद चॅटची माहितीही तपास यंत्रणेला मिळाली आहे. विशेष म्हणजे, अटकेपूर्वीच मनीषा हवालदारने हे चॅट डिलीट केल्याचे उघड झाले आहे. मात्र, डिजिटल पुराव्यांच्या आधारे CBI हे संदेश पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.



घरातून जप्त झाले गोपनीय दस्तावेज


CBI ने मनीषा हवालदारच्या घरावर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यांमध्ये काही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. तपासादरम्यान NTA चे काही गोपनीय आणि अधिकृत दस्तावेज तिने बेकायदेशीररित्या स्वतःकडे ठेवल्याचे समोर आले आहे. याशिवाय, पेपरफुटी रॅकेटमधील इतर संशयित आणि मुख्य आरोपींची ओळख पटवून देणारी महत्त्वाची कागदपत्रेही तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत. मनीषाच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता, या घोटाळ्याशी संबंधित अनेक मोठे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे.



विद्यार्थी आणि पालकही CBI च्या रडारवर


या प्रकरणात केवळ पेपरफुटी करणाऱ्यांचाच नव्हे, तर बेकायदेशीर मार्गाने परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचाही तपास होणार आहे. मनीषा हवालदारने ज्यांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय आहे, अशा विद्यार्थी आणि पालकांची यादी CBI च्या हाती लागल्याची माहिती आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी केली जाणार असून, तपासात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई आणि अटकेची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, 'गॉड' (God) नावाने सेव्ह असलेल्या नंबरमागील व्यक्तीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना