Jammu Kashmir Accident : जम्मू काश्मीरमधील धक्कादायक घटना, गुलमर्ग गोंडोला थांबल्याने ३०० पर्यटक सापडले संकटात !

गुलमर्ग : गुलमर्ग गोंडोला या नावाने प्रसिद्ध असलेली गुलमर्गची केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि सुमारे ३०० पर्यटक संकटात सापडले. लष्कर, पोलीस आणि नागरी प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आणि केबल कारमध्ये अडकलेल्यांची सुटका केली.



गुलमर्गची केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडली. केबल कार बंद झाली त्यावेळी अनेक केबिन या केबलच्या आधाराने पुढे सरकत होत्या. या केबिन जागीच थांबल्या आणि सुमारे ३०० पर्यटक अडकले. भारतीय लष्कराच्या नऊ राजपुताना रायफल्स, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य केले. आवश्यक ते खबरदारीचे आणि सुरक्षेचे उपाय करून केबिनमध्ये अडकलेल्यांची टप्प्याटप्प्याने सुटका करण्यात आली. तांगमार्गचे उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांचे देखरेखीत मदतकार्य करण्यात आले.



गोंडोला अर्थात केबल कार अनपेक्षितपणे थांबली. यामुळे महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक असे अनेक पर्यटक घाबरले. लष्कर, पोलीस आणि नागरी प्रशासनाने केबिनमध्ये अडकलेल्यांची टप्प्याटप्प्याने सुटका केली. मदतकार्य सुरू असताना प्रत्येक पर्यटक मदत करणारे पथक आपल्यापर्यंत कधी पोहोचणार याचीच चाक पक्ष्याप्रमाणे वाट बघत असल्याचे चित्र दिसत होते. मदतकार्य करणाऱ्यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. केबिनमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्याचे काम केले.



जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, "तांत्रिक बिघाडामुळे केबल कार सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्यानंतर सरकार गुलमर्ग गोंडोला येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व केबिन सुस्थितीत असून, अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही."
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र