FD New Rule : येत्या १ ऑक्टोबरपासून FD चे नवे नियम लागू! RBI चा मोठा निर्णय; गुंतवणूकदारांनी आधी हे जाणून घ्या

मुंबई : फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुदत ठेवींवरील व्याजदर आणि त्यासंबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात लागू होणार आहेत.


या बदलांमुळे FD वरील व्याजदर वाढणार किंवा कमी होणार नाहीत, मात्र व्याजदर निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि एकसमान होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही शाखेत समान मुदत आणि समान रकमेच्या FD वर एकच व्याजदर मिळेल. (FD New Rule)



FD गुंतवणूकदारांसाठी काय बदलणार?


RBI च्या नव्या नियमांनुसार, एखाद्या ग्राहकाने एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये एकाच दिवशी समान रकमेची FD केली, तर सर्व शाखांमध्ये त्याला समान व्याजदर मिळेल. म्हणजेच, एकाच प्रकारच्या मुदत ठेवीसाठी वेगवेगळ्या शाखा वेगवेगळे व्याजदर देऊ शकणार नाहीत. यामुळे ग्राहकांशी होणारा भेदभाव कमी होईल. (FD New Rule)



व्याजदरांची माहिती होणार अधिक पारदर्शक :


नव्या नियमांनुसार, सर्व बँकांना FD आणि इतर ठेव योजनांचे व्याजदर आधीच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करणे बंधनकारक असेल. ग्राहकांना यामुळे विविध बँकांच्या व्याजदरांची सहज तुलना करता येईल आणि अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येईल. (FD New Rule)



बल्क डिपॉझिटसाठीही बदल :


RBI ने मोठ्या रकमेच्या बल्क डिपॉझिट संदर्भातील नियमांमध्येही सुधारणा केली आहे. बँकांना बाजारातील परिस्थिती आणि निधी उभारणीच्या गरजेनुसार मोठ्या ठेवींवर स्वतंत्र व्याजदर निश्चित करण्याची मुभा असेल. ही सुविधा NRI रुपया ठेवींनाही लागू होणार आहे. (FD New Rule)



ऑक्टोबरपासून FD चे व्याज वाढणार का?


नाही. RBI ने व्याजदर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. FD चे व्याजदर यापुढेही संबंधित बँकाच त्यांच्या आर्थिक गरजा, बाजारातील परिस्थिती, तरलता आणि निधी उभारणीच्या खर्चानुसार ठरवतील. नव्या नियमांचा उद्देश केवळ पारदर्शकता आणि समानता वाढवणे हा आहे. (FD New Rule)



कोणत्या बँकांवर लागू होतील नवे नियम?


RBI चे हे नवे नियम देशातील जवळपास सर्व प्रमुख बँकिंग संस्थांवर लागू होणार आहेत. यात कमर्शियल बँका, स्मॉल फायनान्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB), लोकल एरिया बँका, पेमेंट बँका आणि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका यांचा समावेश आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी FD गुंतवणूकदारांना या बदलांचा लाभ मिळणार आहे. (FD New Rule)

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं घेतला मोठा निर्णय, महिकासोबत घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन

तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे.

Duleep Trophy 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाचे कर्णधारपद; करुण नायरलाही संधी

मुंबई : भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यावर बीसीसीआयने (BCCI) आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. 23

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या पलीकडे; भारतातील निसर्गरम्य आणि कमी-ज्ञात रानफुलांची अद्भुत ठिकाणे

प्रत्येक पावसाळ्यात उत्तराखंडमधील प्रसिद्ध 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' (फुलांची दरी) आपल्या विविध प्रकारच्या

Indonesia Ferry Boat Accident : इंडोनेशिया समुद्रात भीषण दुर्घटना! प्रवासी फेरी बोटला आग लागून 5 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

जकार्ता : इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी (2 ऑगस्ट) एक मोठी सागरी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या एका

Delhi Earthquake : दिल्ली हादरली! पहाटे २.९ तीव्रतेचा भूकंप; अरुणाचल आणि आसाममध्येही जाणवले धक्के

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली रविवारी (२ ऑगस्ट) पहाटे सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. पहाटे ४.१४ वाजता

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे