EBOLA Disease : इबोलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नागरिकांना सल्ला; काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळा

नवी दिल्ली : इबोला प्रभावित देशांतील बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. काँगो, युगांडा तसेच त्यांच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण सुदान आणि इतर देशांमध्ये हा आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. (EBOLA Disease)



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा सल्ला जारी केला आहे. या सल्ल्यानुसार, सध्या या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि अतिरिक्त खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीने २२ मे रोजी प्रवेशबिंदूंवरील रोगनियंत्रण आणि देखरेख अधिक मजबूत करण्यासाठी काही तात्पुरत्या शिफारशी जारी केल्या आहेत. या शिफारशींमध्ये ‘बुंडिबुग्यो विषाणू आढळलेल्या भागांमध्ये प्रवास टाळावा’ असा सल्लाही देण्यात आला आहे. (EBOLA Disease)



भारतात बुंडिबुग्यो विषाणू स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोला आजाराचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. इबोला हा एक विषाणूजन्य रक्तस्रावी तापाचा आजार असून तो इबोला विषाणूच्या ‘बुंडिबुग्यो’ स्ट्रेनमुळे होतो. हा अत्यंत गंभीर आजार असून त्यामध्ये मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या बुंडिबुग्यो स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोला आजाराच्या प्रतिबंधासाठी किंवा उपचारासाठी कोणतीही लस अथवा विशेष उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आलेली नाही. (EBOLA Disease)



जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम २००५ अंतर्गत १७ मे रोजी या परिस्थितीला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले होते. आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेही डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये पसरलेल्या बुंडिबुग्यो स्ट्रेन इबोला विषाणूच्या सध्याच्या उद्रेकाला अधिकृतपणे ‘खंडीय सुरक्षेशी संबंधित सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले आहे. (EBOLA Disease)

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या