Shooting Outside White House : अमेरिकेत व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत व्हाईट हाऊस बाहेर गेट जवळ गोळीबार झाला. एका व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या बॅगेतून शस्त्र काढून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अंदाधुंद गोळीबार करणारा ठार झाला. या घटनेत एक सामान्य नागरिकही जखमी झाला.





याआधी साधारण महिनाभर आधी २५ एप्रिल २०२६ रोजी व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या वार्षिक भोजन समारंभात गोळीबार झाला होता. गोळीबाराच्या या दोन घटनांमुळे व्हाईट हाऊस आणि अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीक्रेट सर्व्हिसने या प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत. पण व्हाईट हाऊस आणि अमेरिकेचे अध्यक्ष आता सुरक्षित आहेत, असे जाहीर केले.



व्हाईट हाऊसमध्ये शनिवारी ऑन ड्युटी असलेल्या अनेक पत्रकारांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि पत्रकार परिषद ज्या कक्षात होते तिथे जाऊन आश्रय घेतला. पत्रकारांनी गोळीबार प्रकरणी चिंता व्यक्त केली.





हल्लेखोराची ओळख पटली


शनिवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसजवळ गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. अमेरिकेतल्या मेरीलँड प्रांतात राहणारा २१ वर्षांचा नासिर बेस्ट याने गोळीबार केला होता. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी करून जाहीर केले. नासीर बेस्ट हा एक मनोरुग्ण होता आणि त्याने मनाच्या विशिष्ट अवस्थेत गोळीबार केल्याचे समजते. या प्रकरणी तपास सुरू आहे.



नासीरला याआधीही सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याप्रकरणी सीक्रेट सर्व्हिसच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. यामुळे त्याने मानसिक समस्येतून गोळीबार केला की त्यामागे एक पूर्व नियोजित कट होता, याचा सखोल तपास सुरू आहे.



ट्रम्प कुठे होते ?


ज्यावेळी गेट जवळ गोळीबार सुरू होता त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच होते. ते सुरक्षित सुखरूप आहेत. व्हाईट हाऊसमध्ये बातमीदारीसाठी आलेले पत्रकार पण सुरक्षित आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे व्हाईट हाऊसमधून चालणाऱ्या सरकारी कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही.

Comments
Add Comment

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर

Bashar al-Assad : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असदना कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या