IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक यांना पत्र लिहून IPL सामन्यांदरम्यान स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या “सलाम मुंबई” या घोषणेवर तीव्र व गंभीर आक्षेप नोंदवला आहे. श्री दिपक सिंह यांनी म्हटले आहे की, मुंबईची संस्कृती आणि ओळख “सलाम मुंबई” नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी सुसंगत “नमस्कार मुंबई” अथवा “नमस्ते मुंबई” अशी असली पाहिजे. त्यामुळे “सलाम मुंबई” हा शब्दप्रयोग तात्काळ बंद करून त्याऐवजी “नमस्कार मुंबई” किंवा “नमस्ते मुंबई” या शब्दांचा वापर करण्यात यावा.श्री दिपक सिंह यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून महाराष्ट्राची भाषा, गौरवशाली संस्कृती आणि परंपरा जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक मंचांवर महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांच्या मते “सलाम” या शब्दाऐवजी “नमस्कार” किंवा “नमस्ते” हे शब्द महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक भावनांचे अधिक योग्य प्रतिनिधित्व करतात.


तसेच त्यांनी नमूद केले की, मुंबईचे नामकरण मुम्बादेवी यांच्या नावावरून झाले असून या शहराची ओळख तिच्या मूळ सांस्कृतिक संदर्भातच मांडली गेली पाहिजे. मुंबईची सांस्कृतिक ओळख “सलाम” नव्हे, तर मुम्बादेवीप्रती “नमस्कार” आणि “नमस्ते” अशी आहे. भविष्यात IPL किंवा इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यांदरम्यान “सलाम मुंबई”सारख्या घोषणा प्रसारित करू नयेत आणि त्याऐवजी “नमस्कार मुंबई” अथवा “नमस्ते मुंबई” यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


भाजयुमो मुंबई अध्यक्षांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे आणि भविष्यात IPL किंवा इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यात “सलाम मुंबई”सारख्या घोषणांचे प्रसारण पूर्णतः बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच मोठ्या स्क्रीनवर “जय महाराष्ट्र”सारखे संदेश प्रदर्शित केल्यास महाराष्ट्राच्या अस्मिता आणि जनभावनांचा अधिक योग्य सन्मान होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.जनभावनांचा आदर राखत याबाबत तातडीने सकारात्मक आणि योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान