लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस - नागपूर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'गोदाम लॉजिस्टिक्स पार्क'चा भव्य शुभारंभ आणि कोनशिला अनावरण करण्यात आले.


MUMBAI : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये उभारण्यात आलेले अत्याधुनिक आणि स्टेट ऑफ द आर्ट स्वरूपाचे हे लॉजिस्टिक्स पार्क राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवी गती देणारे ठरेल. जागतिक भू-राजकीय परिस्थितीत मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रात भारतासमोर मोठी संधी निर्माण झाली असून, जागतिक सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्र सक्षम करणे आवश्यक आहे.


आपल्याला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करायचे असेल, तर लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘पीएम गति शक्ती योजना’ ही देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारी राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना आहे. या योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, जलमार्ग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांना एकात्मिक पद्धतीने जोडण्यात येत असून, प्रवास व मालवाहतूक अधिक सुलभ, वेगवान व कार्यक्षम होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारच्या या योजनेशी सुसंगत राहून महाराष्ट्र शासनाने राज्याचे स्वतंत्र लॉजिस्टिक्स धोरण आणि पायाभूत सुविधा विकास आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक्स हब बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली यांसारख्या औद्योगिक केंद्रांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, बंदरे, रेल्वे, ड्राय पोर्ट, मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क आणि फ्रेट कॉरिडोरद्वारे जोडण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः नागपूरला देशाचे प्रमुख लॉजिस्टिक्स कॅपिटल म्हणून विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. उद्योजकांनीही महाराष्ट्र सरकारच्या या धोरणाला साथ देत गोदाम लॉजिस्टिक्स पार्कसारख्या उपक्रमांची उभारणी केली असून, हा प्रकल्प मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय चेनमध्ये एक मैलाचा दगड ठरेल असे मुख्यमंत्री फडणवीस नमूद केले.यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक पार्कचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, केदारनाथ गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान