Weather Update : पुढच्या ४८ तासांत मुंबई पुण्यात पाऊस; मात्र विदर्भात उकाड्याचा त्रास सुरूच राहणार

Mumbai : राज्यात पुढील ७२ तास विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. ब्रह्मपुरी येथे शनिवारी तब्बल ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र मान्सून महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ पोहोचल्याने २७ मे नंतर उष्णतेची तीव्रता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात त्याची प्रगती चांगली होत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते.



दरम्यान, विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. ब्रह्मपुरीनंतर अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्येही प्रचंड उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या