Megablock : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. मेन लाईनवर माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.



ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे त्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील उपनगरी गाड्या विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन मार्गावरील सेवा नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.



हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.


ब्लॉक कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत सुटणाऱ्या वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष सेवा चालतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची रेल्वेकडून परवानगी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक