'एसआयआर' प्रक्रियेत एकाही पात्र मतदार वागळणार नाही

 मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम; बोगस मतदान रोखणे हाच मोहिमेचा हेतू


मुंबई : मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या 'एसआयआर' प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कायदेशीर आणि पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी दिली. मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक बनवणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चोक्कलिंगम म्हणाले, अनेकदा निवडणूक काळात मतदार यादीतून नावे गायब असणे, एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असणे किंवा मृत व्यक्तींच्या नावावर मतदान होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येतात. या सर्व त्रुटी कायमच्या दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जात असून, दुबार नावे आणि मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.मात्र, या प्रक्रियेत काही पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक किंवा तांत्रिक चुकीमुळे वगळली जात असल्याचा संशय काही पक्षांकडून केला जात आहे. त्याबाबत विचारले असता चोक्कलिंगम म्हणाले, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक मतदाराला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली जात असून, कोणावरही अन्याय होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे.


कोणत्याही दबावाशिवाय प्रक्रिया सुरू


निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 'एसआयआर' प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, प्रत्येक बदलाची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवली जात आहे. मतदारांनीही आपल्या नावातील चुका दुरुस्त करण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी किंवा नवीन नाव नोंदणीसाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ही प्रक्रिया कोणत्याही दबावाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पूर्ण करून एक अत्यंत शुद्ध आणि निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे चोक्कलिंगम म्हणाले.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक