Yeola : येवला तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळासह गारांचा पाऊस, कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

येवला : येवला तालुक्यात निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नाहीय. सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार थैमान घातले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन तालुक्याच्या पूर्व भागातील रेंडाळ्यासह संपूर्ण परिसरात वादळी वारे आणि गारांच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. आधीच बाजारभाव नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.



या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. परिसरात झालेल्या गारांच्या माऱ्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेले कांदा बियाणे (डोंगळे) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगामासाठी लागवडीचे बियाणे उपलब्ध कसे करायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सलगच्या या निसर्गाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


दरम्यान राज्यात कुठे उष्णतेने तर कुठे पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. विदर्भात सुर्य आग ओकत आहे. ब्रह्यपुरीमध्ये यंदा राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्यपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.



भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात आजही उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला. मागील दोन दिवसांपासून या तिन्ही जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूर, धाराशिव, लातूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. काल पुणे, पिंपरी चिंचवड या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Comments
Add Comment

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे