Raghav Chadha : राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांना भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

Raghav Chadha : राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यसभेच्या एका अधिसूचनेनुसार, राघव चड्ढा यांची याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात 10 सदस्यांचा समावेश आहे. दुसऱ्या एका पत्रकात राज्यसभा सचिवालयाने म्हटले आहे की, राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांनी 20 मे 2026 रोजी राज्यसभा सदस्य डॉक्टर मेनता गुरुस्वामी यांची कॉर्पोरेट कायदा (दुरुस्ती) विधेयक 2026 संदर्भातील संयुक्त समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.


काही दिवसांपूर्वीच राघव चड्ढा यांच्यासह ७ खासदारांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सातही खासदारांनी 27 एप्रिल रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे राज्यसभेत 10 खासदार असलेल्या आम आदमी पक्षाकडे आता केवळ 3 खासदार उरले आहेत. यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे.



दरम्यान आता भाजपने राघव चड्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे पुनर्गठन करत सभागृहातील 10 सदस्यांची या पॅनेलसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत राघव चड्ढा यांच्यासह हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, जेबी माथेर हिशाम, सुभाशीष खुंटिया, रंगव्रा नारझारी आणि संतोश कुमार पी यांचा समावेश आहे.


भाजपमध्ये सामील झालेल्या खासदारांमध्ये राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालिवाल, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंह साहनी यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना