24 Nigerians Arrested From Palava city : ठाणे पोलिसांची धडक कारवाई! पलावा सिटीमधून २४ नायजेरियन ताब्यात; ड्रग्ज रॅकेटशी संबंधांचा तपास

ठाणे : ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या राबवलेल्या मोठ्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये खोणी-पलावा परिसरातून २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पलावा सिटी परिसरात एकच खळबळ उडाली असून, या विदेशी नागरिकांचे अंमली पदार्थ तस्करीशी काही संबंध आहेत का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. (24 Nigerians Arrested From Palava city)


ही मोठी कारवाई शनिवार २३ मे रोजी पहाटे ३ ते सकाळी १० वाजेदरम्यान करण्यात आली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या पथकांनी हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत विदेशी नागरिकांची कागदपत्रे, वास्तव्यासंबंधी माहिती आणि त्यांच्या हालचालींची पडताळणी केली. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी याबाबत माहिती दिली. (24 Nigerians Arrested From Palava city)



पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या २४ जणांमध्ये १४ पुरुष, ६ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. हे नागरिक मूळचे नायजेरियन असून त्यांचे संबंध दक्षिण आफ्रिकेतील घाना आणि युगांडा भागाशी असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान काही जणांकडे वैध कागदपत्रे आढळली, तर काही जणांकडे व्हिसा आणि पासपोर्ट नसल्याचे उघड झाले. (24 Nigerians Arrested From Palava city)


२४ पैकी ७ जणांकडे आवश्यक कागदपत्रे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर ८ जणांकडे व्हिसा किंवा पासपोर्ट नव्हते. उर्वरित ९ जणांविरोधात न्यायालयात विविध खटले सुरू असल्याने त्यांचे पासपोर्ट न्यायालयात जमा असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेल्या ९ जणांवर एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. (24 Nigerians Arrested From Palava city)



दरम्यान, या ऑपरेशनदरम्यान एक नायजेरियन महिला पोलिसांपासून बचाव करण्यासाठी इमारतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रयत्नात ती जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची माहिती घेतल्यानंतर तिच्याविरोधातही पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (24 Nigerians Arrested From Palava city)


या छापेमारीदरम्यान नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ नायजेरियन आरोपीलाही पकडण्यात यश आले. त्याला पुढील चौकशीसाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (24 Nigerians Arrested From Palava city)


पोलिसांनी सांगितले की, पलावा परिसरात तुलनेने कमी भाड्यात घरे उपलब्ध होत असल्याने अनेक विदेशी नागरिक येथे वास्तव्यास येतात. मात्र, घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली होती का, याचीही चौकशी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून पोलिसांना माहिती न देता विदेशी नागरिकांना घरे भाड्याने देणाऱ्या घरमालकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच अशा व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या प्रॉपर्टी एजंट्सनाही नोटिसा बजावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.



या संपूर्ण कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, दोन सहाय्यक आयुक्त, २५ अधिकारी आणि तब्बल ८० पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सध्या ताब्यात घेतलेल्या सर्व विदेशी नागरिकांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांपासून संपर्क जाळ्यापर्यंत सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. (24 Nigerians Arrested From Palava city)

Comments
Add Comment

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Nitesh Rane : आजपासून मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी'च म्हणा!

- मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन; कोणाच्याही दहशतीला भीक घालू नका मुंबई : "मुंब्रा हे शहर कोणत्याही एका

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट