Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला विक्रमी २.८७ लाख कोटींचा लाभांश

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला तब्बल २.८७ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्याची घोषणा केली आहे. जागतिक आर्थिक आव्हाने, वाढती अनिश्चितता आणि विविध आर्थिक दबावांच्या पार्श्वभूमीवर हा निधी केंद्र सरकारसाठी मोठा आर्थिक दिलासा मानला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासातील केंद्र सरकारला दिला जाणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश ठरणार आहे. (Reserve Bank Of India)


हा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६२३ व्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भूषविले. बैठकीत वित्त वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारला २.८७ लाख कोटी रुपयांचा अधिशेष हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली. (Reserve Bank Of India)



मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. यंदाचा लाभांश त्या तुलनेत अधिक असून नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Reserve Bank Of India)


रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात जोखीम तरतूद आणि वैधानिक निधीमध्ये हस्तांतरण करण्यापूर्वी बँकेचे निव्वळ उत्पन्न ३ लाख ९५ हजार ९७२.१० कोटी रुपये इतके राहिले. मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हेच उत्पन्न ३ लाख १३ हजार ४५५.७७ कोटी रुपये होते. त्यामुळे यंदा उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Reserve Bank Of India)



यापूर्वी २०२३-२४ मध्ये रिझर्व्ह बँकेने २.१ लाख कोटी रुपये, तर २०२२-२३ मध्ये ८७ हजार ४१६ कोटी रुपये केंद्र सरकारकडे हस्तांतरित केले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत लाभांशाच्या रकमेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. (Reserve Bank Of India)


रिझर्व्ह बँकेच्या या विक्रमी लाभांशामुळे केंद्र सरकारच्या महसुलात मोठी भर पडणार असून पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना आणि विकास प्रकल्पांसाठी अतिरिक्त आर्थिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Reserve Bank Of India)

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण