SBI Close For a Week : SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! उद्यापासून बँक सेवा ठप्प होण्याची शक्यता; आजच उरका महत्त्वाची कामे

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India (SBI) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. उद्यापासून म्हणजेच शनिवार २३ मे ते २८ मे २०२६ दरम्यान एसबीआयच्या शाखा सलग अनेक दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी आपली अत्यावश्यक बँकिंग कामे आजच पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. (SBI Close For a Week)


वीकेंडच्या सुट्ट्या, प्रस्तावित कर्मचारी संप आणि बकरी ईदच्या सुट्ट्यांमुळे शाखांमधील नियमित व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चेक क्लिअरिंग, रोकड व्यवहार, पासबुक अपडेट आणि शाखेशी संबंधित इतर कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. (SBI Close For a Week)



२३ ते २८ मेदरम्यान बँका का बंद राहणार? 


२३ मे हा महिन्याचा चौथा शनिवार असून २४ मे रोजी रविवार आहे. नियमानुसार देशातील सर्व बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी बंद असतात. त्यामुळे या दोन दिवशी एसबीआयच्या शाखांमध्ये कामकाज होणार नाही. (SBI Close For a Week)



कर्मचारी संघटनांचा दोन दिवसांचा संप :


ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने (AISBISF) विविध मागण्यांसाठी २५ आणि २६ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. हा संप प्रामुख्याने लिपिक आणि कर्मचारी वर्गाचा असल्याने शाखांमधील दैनंदिन व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. कर्मचाऱ्यांनी वेतन, सेवा अटी, कामाचा ताण आणि इतर कर्मचारी हिताच्या मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे सांगितले जात आहे. (SBI Close For a Week)



बकरी ईदमुळे आणखी सुट्ट्या :


भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बकरी ईद निमित्त विविध राज्यांमध्ये सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. देशातील बहुतांश भागांमध्ये २७ मे रोजी बँका बंद राहतील, तर काही राज्यांमध्ये २८ मे रोजीही सुट्टी असेल. (SBI Close For a Week)


विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये २७ आणि २८ मे या दोन्ही दिवशी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांत सलग सहा दिवस शाखा सेवा प्रभावित राहू शकते. (SBI Close For a Week)



या काळात कोणत्या सेवा सुरू राहणार?


शाखा बंद असल्या तरी ग्राहकांसाठी काही डिजिटल सेवा सुरू राहणार आहेत. त्यामध्ये :


- इंटरनेट बँकिंग
- मोबाइल बँकिंग
- यूपीआय व्यवहार
- एटीएम सेवा
- ऑनलाइन फंड ट्रान्सफर
- कार्ड पेमेंट सेवा


या सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र तांत्रिक अडचणी किंवा मोठ्या प्रमाणातील व्यवहारांमुळे काही सेवा संथ होऊ शकतात.



कोणत्या सेवांवर होणार परिणाम ?


शाखांमधील खालील सेवा प्रभावित होऊ शकतात :


- चेक क्लिअरिंग
- रोकड जमा आणि पैसे काढणे
- पासबुक अपडेट
- डीडी आणि चेकबुक सेवा
- कर्ज व खाते संबंधित शाखा व्यवहार
- केवायसी अपडेट प्रक्रिया


त्यामुळे ग्राहकांनी शेवटच्या क्षणी अडचण टाळण्यासाठी आवश्यक व्यवहार वेळेत पूर्ण करावेत, असा सल्ला बँकिंग तज्ज्ञांकडून दिला जात आहे.


दरम्यान, संपाबाबत अंतिम निर्णय आणि सुट्ट्यांचे वेळापत्रक संबंधित राज्यांनुसार बदलू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या स्थानिक शाखेशी संपर्क साधून माहिती घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (SBI Close For a Week)

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण