इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून नायर रुग्णालयात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर; रुग्णांना जलद व अचूक निदान सेवा


मुंबई: मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या सीएसआर निधीतून अत्याधुनिक पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार निदान सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या महानगरात सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. नायर रुग्णालयातील नव्या हायटेक बायोकेमिस्ट्री अ‍ॅनालायझरमुळे रुग्णांच्या तपासणी अहवालांचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून डॉक्टरांना उपचारासंदर्भात जलद निर्णय घेणे शक्य होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता वाढविणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणावरील नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल तपासण्या वेगाने आणि अचूकपणे करण्यास सक्षम आहे. 24 तास कार्यरत असलेल्या सेंट्रल पॅथॉलॉजी लॅबमध्ये ही प्रणाली बसविण्यात आल्याने नमुन्यांच्या तपासणीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल हे मुंबईतील महत्त्वाचे शासकीय वैद्यकीय संस्था असून, येथील बायोकेमिस्ट्री विभाग वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. आधुनिक स्वयंचलित नालायझर्सच्या साहाय्याने दररोज मोठ्या प्रमाणावर नमुन्यांची तपासणी करण्यात येते. नव्या उपकरणामुळे प्रयोगशाळेतील कार्यक्षमता, अचूकता आणि अहवाल वितरणाचा वेग अधिक सुधारला जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसआर माध्यमातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला सहकार्य करणाऱ्या उद्योग समूहांचेही कौतुक केले. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्यामुळे राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होत असून, अशा उपक्रमांमुळे गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले
Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले