Maharashtra Weather Update : कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट, राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे. विदर्भामध्ये उष्णतेचा दाह वाढलेला असताना काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



 वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी


हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' (Yellow Alert)जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो. यामध्ये कोल्हापूर, सांगली ,सोलापूर, लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.



विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट


कोल्हापूर, सांगली ,सोलापूर, लातूर धाराशिव या पाचही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे.



 'याठिकाणी' उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'


राज्यात एका बाजूला पावसाचे वातावरण तयार होत असताना, विदर्भाची मात्र सध्या भट्टी झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. गुरुवारी (21 मे) विदर्भात तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली असून, हवामान विभागाने शुक्रवार (22 मे) आणि शनिवार (23 मे) अशा दोन्ही दिवशी विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट' ('Red alert') जारी केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे राज्यावर उष्णतेची लाट आणि आता पावसाचे इशारा असे दुहेरी संकट राज्यावर निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक