Friday, May 22, 2026

नाशिक शहरातील 'या' भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक शहरातील 'या' भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक : सातपूर विभागात शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासून सुरू होणाऱ्या जलवाहिनीला मोतीवाला महाविद्यालय परिसरात गळती सुरू आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी हाती घेण्यात येणार आहे , त्यामुळे सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील चार प्रभागात शनिवारी म्हणजेच उद्या पाणी पुरवठा होणार नाही. तर रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) यासंदर्भात माहिती दिली आहे. रस्त्यांच्या खोदकामामुळे सध्या अनेक ठिकाणी जलवाहिनी संदर्भात विविध समस्या निर्माण होत असून या घटनाक्रमात आता शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून सातपूर आणि नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीची नव्याने भर पडली आहे.

ध्रुवनगर येथील मोतीवाला महाविद्यालय येथे या वाहिनीची गळती सुरू असून दुरुस्तीचे काम तातडीने करावे लागणार आहे. शनिवारी हे काम केले जाणार आहे. त्यामुळे सातपूर व नाशिक पश्चिममधील चार प्रभागातील अनेक भागात शनिवारी पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.

'या' भागात पाणीपुरवठा बंद Water supply off on Saturday

शनिवारी पाणी पुरवठा न होणाऱ्या प्रभागात सातपूर (Satpur) विभागातील प्रभाग क्रमांक आठमधील सावरकरनगर, नरसिंहनगर, दाते नगर, आनंदवल्ली, नवश्या गणपती मंदीर परीसर, बेंडकुळे नगर, गंगापूर गांव, सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर, सदगुरुनगर, सुयोग कॉलनी आणि काळेनगर परिसराचा समावेश आहे.

प्रभाग नऊमधील रामेश्वर कॉलनी, श्रमिकनगर परीसर, गंगासागर नगर, शिवाजीनगर, अहिल्याबाई होळकर चौक, धर्माजी कॉलनी, जिजामाता कॉलनी, शिंदोरी रस्ता परीसर, कडेपठार चौक, छत्रपती संभाजी नगर व धृव नगर परीसर तरप्रभाग क्रमांक १० मध्ये अशोकनगर जलकुंभ परीसर, जाधव संकुल, सुला चौक ते पपया नर्सरी चौक, मौले हॉल, अंबिका स्विट मागील आदी परिसरात पाणीपुरवठा बंद आहे.

तर नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, माणिकनगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर, डॉन बास्को, तिरुपती टाऊन परिसर, तेजोप्रभा कॉलनी, श्रमिक कॉलनी, दादोजी कोंडदेव नगर, आयचितनगर, चैतन्यनगर, सहदेव नगर, पंपिग स्टेशन, गीतांजली सोसायटी, रामराज्य जलकुंभ परीसर, पूर्णवादनगर, आकाशवाणी टॉवर, सुयोजित गार्डन, शांती निकेतन आदी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. या सर्व भागात रविवारी (दि.२४ )सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >