Pune Acid Attack : “तू माझी नाहीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर जीवघेणा अॅसिड हल्ला

पुणे : पुण्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात आंधळा झालेल्या एका माथेफिरू तरुणाने तरुणी आणि तिच्या मित्रावर अॅसिडसदृश रासायनिक पदार्थ फेकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतात. बुधवारी पहाटे काम आटोपल्यानंतर दोघेही ताडीवाला रोड परिसरातील आपल्या राहत्या घराकडे निघाले होते. त्याच वेळी आरोपी श्रीराम मधु सरुन हा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून दबा धरून बसला होता.



पीडित तरुणी ही आरोपीसोबत राहण्यास नकार देत आपल्या मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याचाच राग आरोपीच्या मनात होता. दोघांचा रस्ता अडवत आरोपीने तरुणीला, “तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी दिली.


काही समजण्याच्या आतच आरोपीने स्वतःसोबत आणलेल्या प्लास्टिकच्या ड्रममधील अॅसिडसारखा तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ थेट तरुणीच्या अंगावर फेकला. या हल्ल्यात तरुणीची मान, पाठ आणि दोन्ही पाय गंभीर भाजले गेले आहे. तरुणी वेदनेत असताना आरोपीने तिच्या मित्रावरही तोच रासायनिक पदार्थ फेकला. या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.



हल्ल्यानंतर आरोपीने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही धक्कादायक घटना २० मे रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात घडली.


शहराच्या मध्यवस्तीत भररात्री झालेल्या या अॅसिड हल्ल्याची माहिती मिळताच पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी कर्नाटकमध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत आरोपी श्रीराम मधु सरुन (वय २०) याला बेड्या ठोकल्या. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतले संतांच्या पादुकांचे दर्शन

पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Eknath Shinde : मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यामागे घातपाताचा कट होता का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल; विरोधी पक्षानेत्याने जबाबदारीने वागणे अपेक्षित मुंबई (Mumbai): "ज्या ठिकाणी

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

NITESH RANE : वैभववाडी नाधवडे येथील प्रस्तावित 'एमआयडीसी' आता पर्यायी जागेवर; पालकमंत्री नितेश राणे

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे होणार फायदा https://prahaar.in/2026/07/22/western-railway-railone-app-western-railway-urges-passengers-to-use-the-railone-app/ मुंबई : वैभववाडी

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ४४ हजार कोटींच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ची अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार मुंबई(Mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस