Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा शोधण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. बोरीवलीतील गोराई (Gorai) येथे साकारण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिलेवहिले 'कांदळवन पार्क' (Mangrove Park) येत्या २८ मे रोजी नागरिकांसाठी खुले होणार आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांनी अधिकृत माहिती दिली असून, गुरुवारी सकाळी १० वाजता या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.



या नयनरम्य प्रकल्पाला 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpeyi) कांदळवन पार्क' असे नाव देण्यात आले आहे. या पार्कचे रीतसर उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या शुभहस्ते होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असेल. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात, २०२१ मध्ये तत्कालीन पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने झाली होती. ८ हेक्टरच्या विस्तृत जागेवर पसरलेल्या या पार्कचे काम जवळपास वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र, उद्घाटनाच्या तारखा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे ते सर्वसामान्यांसाठी बंदच होते. आता उद्घाटनाचा मुहूर्त सापडल्याने पर्यटकांचा मार्ग मोकळा झाला आहे.



कांदळवन पार्कची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आकर्षणे


मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात हे नवीन पार्क 'पर्यावरण-पर्यटन' वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या पार्कची रचना पर्यटकांना किनारी परिसंस्थेची (Coastal Ecosystem) जवळून ओळख करून देण्यासाठी केली गेली आहे. या पार्कचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ७५० मीटर लांबीचा उंचावर बांधलेला चालण्याचा मार्ग (Elevated Boardwalk). विशेष म्हणजे, हा मार्ग तयार करताना एकाही कांदळवनाची कत्तल करण्यात आलेली नाही. या मार्गावरून चालताना पर्यटकांना थेट खाडीकिनारी उभारलेल्या 'व्ह्यूइंग डेक'पर्यंत पोहोचता येईल. निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी येथे तब्बल १८ मीटर उंचीचा एक 'बर्डवॉचिंग टॉवर' उभारण्यात आला आहे. पर्यटकांना कांदळवनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी दोन मजली 'नेचर इंटरप्रिटेशन सेंटर' तयार करण्यात आले आहे. यात सुसज्ज ग्रंथालय, विविध कार्यशाळांसाठी जागा, कॅफे, आकर्षक रूफटॉप रेस्टॉरंट आणि भेटवस्तूंचे दुकान (Gift Shop) अशा उत्तम सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Water Resources Department : धरणांच्या काठी पर्यटनाला येणार नवा बहर

- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश मुंबई : अथांग

MLA Sangram Jagtap : टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून धीरज परदेशीची हत्या

- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई